महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Alia Bhatt Flaunts : आलिया भट्टचा नो मेकअप लुक फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल - आलियाची क्यूट सेल्फी

बॉलिवूडची गंगूबाई आलिया भट्टचा पुन्हा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो चाहत्यांना फार पसंत पडला आहे. या फोटोत ती नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे.

Alia Bhatt
आलिया भट्ट

By

Published : Jun 7, 2023, 3:55 PM IST

मुंबई : आलिया भट्ट हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. अवघ्या 11 वर्षात आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत मोठा ठसा उमटवला आहे. आज आलियाला बॉलिवूडची 'गंगूबाई' म्हणून ओळखली जाते. लग्नानंतरही आलिया भट्ट चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. आता आलिया ही आई झाली आहे. आलिया आणि रणबीर कपूर त्यांची मुलगी राहा फार जपतात जोडप्याने या आजपर्यंत आपल्या मुलीचा चेहरा जगाला दाखवलेला नाही. आलिया ही नेहमीच सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आलिया अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळी आलियाने तिचा नो-मेकअप फोटो शेअर केला आहे. आलियाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना फार पसंत पडला आहे. या फोटोवर अनेक लाईक आणि कमेंट आल्या आहे. आलिया या फोटोमध्ये फारच देखणी दिसत आहे.

आलियाचा खूप क्यूट सेल्फी :आलिया भट्टने 7 जूनच्या सकाळी इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला. हा फोटो शेअर करत आलियाने लिहिले आहे की, '२.३ सेकंदांनंतर एकटी'. आता आलियाच्या या क्यूट सेल्फीवर अभिनेत्रीच्या चाहत्यांकडून लाईक्सचा ओघ आला आहे.

खूप गोंडस - चाहते म्हणाले : आलिया भट्टच्या या फोटोला तासाभरात 7 लाख 70 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. आलियाचा सेल्फी लाइक करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीच्या सेल्फीवर मनमोहक कमेंटही केल्या आहेत. एकाने खूप गोंडस लिहिले, तर दुसऱ्याने राहा की मम्मा लिहिले, तर आणखी एकाने लिहिले आप कितनी क्यूट हो, तर आणखी एका दुसर्‍या चाहत्याने सुपर मॉम आलिया अशाप्रकारच्या कमेंट या फोटोवर येत आहे.

आलियाचा वर्कफ्रंट :आलिया भट्ट आगामी काळात तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये रॉकी आणि राणीची प्रेम कहानी आणि जी ले जरा या दोन बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. तर येत्या जुलै महिन्यात रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी रिलीज होणार असून अद्याप 'जी ले जरा' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झालेले नाही. तर आलिया तिच्या पहिल्या हॉलिवूड प्रोजेक्ट हार्ट ऑफ स्टोनमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

  1. Bigg Boss OTT Season 2 : सलमान खान होस्ट करणार बिग बॉस ओटीटी सीझन 2
  2. Big B greets fans bare feet : प्रेक्षकांना अभिवादन करताना पायात चप्पल का घालत नाही, याचा बिग बींनी केला खुलासा
  3. Sidharth Malhotra Reeact : कियारा अडवाणीच्या 'सत्यप्रेम की कथा'च्या ट्रेलरवर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details