मुंबई - बिग बॉ, ओटीटी विजेता एल्विश यादवच्या विजयाचा ज्वर बॉलिवूडमध्येही पसरला आहे. इंस्टाग्रामवर नुकत्याच झालेल्या आस्क मी एनीथिंग सेशन दरम्यान, आलिया भट्टला बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवसाठी काही शब्द बोलण्यास सांगण्यात आले. यावेळी तिने आपल्या इन्स्टाग्रावर तिने रेड हार्ट इमोटिकॉन टाकले. या संधीचे रुपांतर सोन्यात करण्यास एल्विश विसरला नाही, लगेच त्याने आलियाला 'आय लव्ह यू' लिहूनत पोस्ट करत प्रतिसाद दिला.
यापूर्वीही आलियाने एल्विशचे कौतुक केले होते. रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या प्रमोशनमध्येही तिने यूट्यूबर एल्विशला आपला पाठिंबा दर्शवला होता. आलियाने एल्विशचा उल्लेख 'रॉकी व्यक्तिमत्व' असा केला आणि त्याच्या विनोदबुद्धीबद्दल आपुलकी दाखवली. आलियाने त्याच्याबद्दल केलेल्या कौतुकाबद्दल एल्विशला नक्कीच आश्चर्य वाटले होते.
आता, आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान यूट्यूबर एल्विशबद्दल विचारले असता, तिने Systummm असे लिहिले आणि काही रेड हार्ट इमोजीसह प्रतिसाद दिला, आणि पुढे तिने आपणही एल्विशची समर्थक असल्याचे म्हटले आहे. बििग बॉस ओटीटीटी २ मुळे त्याला प्रसिद्धीचे वलय मिळाल आणि तो आता देशभर लोकप्रिय बनला आहे. ही स्पर्ध जिंकताना त्याने प्रतिस्पर्धी अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, मनीषा राणी आणि बेबीका धुर्वे यांना पराभूत केले. वाईल्ड कार्ड सहभागी स्पर्धकाचा हा पहिला विजय आहे. एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटी २ मधील सर्वात मजबूत उमेदवारांपैकी एक होता आणि अशा प्रकारे शोमध्ये वाइल्डकार्ड सहभागी असूनही त्याने ट्रॉफी जिंकली आणि इतिहास रचला. त्याची या स्पर्धेत एन्ट्री झाल्यानंतर प्रतिस्पर्धी अभिषेक मल्हानसोबत घट्ट मैत्री जमली होती. मल्हानही लोकप्रिय आणि स्ट्रआँग स्पर्धक होता. मात्र जस जसा खेळ रंगत गेला तेव्हा त्याच्या नात्यातही दरार वाढत गेली.
एल्विश यादव, भारतातील एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्प्ल्यूयन्सर आहे. त्याचे 12 दशलक्षाहून अधिक सदस्य असलेले यूट्यूब चॅनल आहे. त्याने हे चॅनल २०१६ मध्ये सुरू केले होते.