मुंबई- Sky Force Teaser Release: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार एका वर्षात अनेक चित्रपटांमध्ये काम करतो. अक्षय कुमारचे 2023 मध्ये आतापर्यंत 2 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय त्यांचा 'मिशन रानीगंज' चित्रपट आता येणाऱ्या दिवसात रिलीज होईल. दरम्यान आता, अक्षय कुमारनं गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षय कुमारनं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले आहे की, 'स्काय फोर्स' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारनं त्याच्या 'स्काय फोर्स' चित्रपटामधील एक टिझर शेअर केला आहे. चला जाणून घेऊया काय असेल अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटाची कहाणी.
स्काय फोर्सचा टिझर रिलीज : 'स्काय फोर्स' कहाणी ही भारत आणि पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये भारत - पाकिस्तानच्या पहिल्या युद्धातील आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व सैनिकांचे शौर्य दाखविल्या जाणार आहे. टीझरमध्ये सध्या अक्षयची कोणतीही झलक दिसलेली नाही. अक्षयनं इंस्टाग्रामवर टीझर शेअर करत लिहले, 'आज गांधी-शास्त्री जयंतीच्या दिवशी संपूर्ण देश 'जय जवान जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. असं म्हणत आहे. 'स्काय फोर्स'ची कहाणी अविश्वसनीय आहे, भारताच्या पहिल्या आणि सर्वात प्राणघातक हवाई हल्ल्याची कहाणी जाहीर करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस नाही. जय हिंद, जय भारत'. जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजन प्रस्तुत, 'स्काय फोर्स' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर 2 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.