मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच त्याला हेरा फेरी या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटाच्या भाग 3 मधून काढून टाकण्यात आल्याची बातमी आली होती. मात्र एका मीडिया मुलाखतीत अक्षय कुमारने चित्रपटाच्या फीच्या वादामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले. हा चित्रपट सोडल्याबद्दल अक्षयने त्याच्या चाहत्यांची माफीही मागितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयने या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये मागितले होते, परंतु हे शक्य झाले नाही आणि अक्षय कुमारची भूमिका अभिनेता कार्तिक आर्यनकडे गेली. या सगळ्या वादात आता अक्षयने त्याच्या एकांतातील एक फोटो शेअर केला आहे.
अक्षय कुमार निसर्गाच्या कुशीत- अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''मी एकता नगरमध्ये आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ, जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. इथे निसर्गाच्या कुशीत खूप काही करायचे आहे, तुम्ही इथे आला आहात का?''