मुंबई - अभिनेता अक्षय कुमारचा रक्षा बंधन हा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचे यापूर्वीचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर रक्षा बंधनच्या प्रमोशनसाठी अक्षय भरपूर वेळ देत आहे. चार बहिणींचा भाऊ असलेला नायक या चित्रपटात तो साकारत आहेत. या कौटुंबिक चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो अक्षयने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
''घट्ट नाते असलेल्या या चित्रपटात खरोखरच घट्ट नाती तयार झाली, या अतिशय खास चित्रपटाचे काही खास क्षण शेअर करत आहे, 1 महिन्यात तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येत आहे. #रक्षाबंधन 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.'', असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.
पहिल्या फोटोत अक्षय कुमार चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री भूमी पेडणेकर यांना डोळे मिचकावताना दिसत आहे.
दुसऱ्या फोटोत दिग्दर्शक आनंद एल राय अक्षयला मिठी मारताना दिसत असून, तर तो निळ्या-चेक केलेल्या शर्टमध्ये खुर्चीवर बसलेला दिसतो.
आणखी एका फोटोत अभिनेता अक्षय कुमार 'रक्षा बंधन'च्या सर्व महिला कलाकार भूमी पेडणेकर, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत, सहजमीन कौर आणि सादिया खतीब यांच्यासोबत दिसत आहे.