मुंबई - Welcome To The Jungle Shooting :अभिनेता अक्षय कुमारच्या कॉमेडी आयकॉनिक चित्रपट 'वेलकम'ला आज 21 डिसेंबर रोजी 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित 'वेलकम' या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल , अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे सर्व कलाकारांनी आपल्या धमाल विनोदानं प्रेक्षकांची मने जिंकली होती. 'वेलकम' हा चित्रपट खूप लोकप्रिय आहे. 'वेलकम' 21 डिसेंबर 2007 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, अक्षय कुमारनं 'वेलकम टू द जंगल' या तिसऱ्या भागाच्या सेटवरील एक अॅक्शन सीन शेअर केला आहे. अक्षयचा हा अॅक्शन सीन खूप जोरदार आहे.
अक्षय कुमार आणि संजय दत्तचा अॅक्शन सीन : अक्षय कुमारनं त्याच्या इंस्टाग्रामवर 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील एक व्हिडिओ शेअर करून लिहिलं, ''किती सुंदर योगायोग आहे, आज आपण 'वेलकम'ची 16 वर्षे साजरी करत आहोत. आज मी या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग करत आहे. संजू बाबाचं या चित्रपटामध्ये स्वागत आहे.'' 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट निर्मात्यांमधील वादामुळं रखडला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, आता याला पूर्णविराम अक्षयनं लावला आहे. अक्षयनं शूटिंग सेटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संजय दत्त हा घोड्याच्या मागे बाईकवरून येत आहे. या घोड्यावर अक्षय बसून आहे.