हैदराबाद - अभिनेता अजित कुमारचे वडील पी सुब्रमण्यम मणी यांचे शुक्रवारी वयाच्या ८५ व्या वर्षी घरी झोपेतच निधन झाले. कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनानुसार, ते बऱ्याच काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. अजितच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले अजित, अनिल आणि अनुप असा परिवार आहे.
अजितच्या फॅन क्लब पेजवर कुटुंबाकडून एक स्टेटमेंट शेअर करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, 'प्रदीर्घ आजारानंतर आमचे वडील पीएस मणी यांचे शुक्रवारी पहाटे झोपेत असताना निधन झाले. चार वर्षांपूर्वी त्यांच्यावरील स्ट्रोकनंतर त्यांना आणि आमच्या कुटुंबाला अनेक वैद्यकीय तज्ञांनी घेतलेल्या काळजी आणि दिलेल्या मदतीबद्दल आम्ही आभारी आहोत.' त्यात पुढे म्हटले आहे की, मणी चांगले आयुष्य जगले, त्यांना आपल्या पत्नीचे किती अतूट प्रेम मिळाले याची आम्हाला जाणीव आहे. जवळपास सहा दशके त्यांनी कुटुंबाच्या कठीण काळात मोलाची साथ दिली. आमचे सांत्वन करणारे, शोक संदेश पाठवणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. आम्ही वेळेवर कॉल घेऊ शकत नसलो किंवा संदेशांना प्रतिसाद देऊ शकत नसलो तर तुमची समजूत काढतो, असे निवेदनात म्हटलंय.