महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Aishwarya Rai Bachchan : माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननं केला पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक; युजर्सनं केलं ट्रोल... - Aishawrya Rai Bachchan

Aishwarya Rai Bachchan : माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननं पॅरिस फॅशन वीकमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक केला. दरम्यान आता ऐशला काहीजण सोशल मीडियावर ट्रोल करत आहे.

Aishwarya Rai Bachchan
ऐश्वर्या राय बच्चन

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 8:43 PM IST

मुंबई - Aishwarya Rai Bachchan : बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननं पॅरिस फॅशन वीकमध्ये जबरदस्त रॅम्प वॉक करून खळबळ उडवून दिली आहे. या फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना ऐश्वर्या राय खूप खास दिसत होती. दरम्यान आता ऐश्वर्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. यावेळी ऐश्वर्या राय रॅम्पवर गोल्डन आउटफिट्समध्ये होती. या आउटफिटमध्ये ती खूप देखणी दिसत होती. सध्या तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटो आणि व्हिडिओमध्ये ऐश्वर्या अतिशय आत्मविश्वासनं रॅम्पवर चालताना दिसत आहे.

ऐश्वर्या राय झाली ट्रोल : रॅम्पवर गोल्डन स्टाईलमध्ये ऐश ही कधी फ्लाइंग किस देताना तर कधी डोळे मिचकावताना दिसत आहे. या फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायनं गोल्डन हाय हील्स, कानातले आणि डायमंड रिंगसह फ्लोअर स्वीपिंग बॉडीकॉन गाऊन परिधान केला. ऐशचा हा लूक नेटिझन्सना फारसा आवडला नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे तिला आता सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. तिच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरनं लिहलं, 'आता ऐश्वर्याकडे ती गोष्ट राहिली नाही, तिनं स्वत:ला थोडे लक्ष केंद्रित केले पाहिजे' तर दुसर्‍या युजरनं ऐश्वर्याचा लूक बकवास असल्याचं वर्णन केले आहे. ऐशच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. 30 सप्टेंबर 2023 रोजी ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या पॅरिसला रवाना झाली. एअरपोर्टवर आई-मुलीची जोडी स्टायलिश अंदाजात दिसली होती.

ऐश्वर्या रायनं दिली फोटोसाठी पोझ : ऐशनं फॅशन वीकमध्ये केंडल जेनर, कॅमिला कॅबेलो आणि एले फॅनिंग यांच्यासोबत फोटोसाठी पोझही दिली आहे. ऐश्वर्या रायचा केंडल जेन्नरसोबत पोझ देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र हसताना आणि बोलताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत ऐश्वर्या राय केंडल जेनर, इवा लॉन्गोरिया, कॅमिला कॅबेलो आणि एले फॅनिंगसह स्टेजवर पोझ देत आहे. ऐशच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटी मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन 2' मध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3', 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' हे चित्रपट रिलीजच्या पाचव्या दिवशी किती कमाई करणार ?
  2. Tejas teaser out: कंगना राणौत स्टारर 'तेजस' चित्रपटचा टीझर झाला प्रदर्शित; पहा टीझर...
  3. Sky Force Teaser Release: अक्षय कुमारनं आगामी चित्रपट 'स्काय फोर्स'चा टीझर केला प्रदर्शित; पहा टिझर...

ABOUT THE AUTHOR

...view details