महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

SRK greets a sea of fans : पठाण रिलीजच्या आधी मन्नतच्या बाहेर चाहत्यांची अलोट गर्दी, शाहरुखने केले अभिवादन - पठाण चित्रपटाचे मोशन

पठाण चित्रपटाच्या रिलीजच्या आधी, सुपरस्टार शाहरुख खानने मुंबईतील मन्नत या त्याच्या निवासस्थानी गर्दी केलेल्या चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. शाहरुखने चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एक व्हिडिओही शेअर केला आहे.

SRK greets a sea of fans
SRK greets a sea of fans

By

Published : Jan 23, 2023, 9:48 AM IST

मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानचे चाहते चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आपल्या आवडत्या सुपरस्टारला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याला पुन्हा पडद्यावर पाहायला सिनेमा हॉलमध्ये जाण्यासाठी अजून काही दिवस बाकी असताना, सुपरस्टारने रविवारी संध्याकाळी त्याच्या चाहत्यांना त्याच्या घरातून मन्नतच्या छतावरून अभिवादन करून आश्चर्यचकित केले.

शाहरुखने त्याच्या घराबाहेर जमलेल्या हजारो चाहत्यांना अभिवादन केले आणि सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केला. व्हिडिओमध्ये, मुंबईतील शाहरुखच्या घराबाहेर अलोट गर्दीत लाल रंगाची कार अडकलेली दिसत आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना, शाहरुखने लाल कार मध्यभागी कशी अडकली यावर एक मजेदार कमेंट देखील दिली. त्याने लिहिले, 'रविवारच्या एका सुंदर संध्याकाळबद्दल धन्यवाद... माफ करा, पण मला आशा आहे की 'लाल गाडी वालोने अपनी कुर्सी की पेटी बांध ली थी'. पठाणसाठी तुमची तिकिटे बुक करा आणि मी तुम्हाला यापुढे तिथे भेटेन.'

पठाणबद्दल बोलायचे तर, हा चित्रपट आदित्य चोप्राच्या महत्त्वाकांक्षी गुप्तचर विश्वाचा एक भाग आहे आणि त्यात देशातील सर्वात मोठे सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे.

शाहरुखचे दोन बहुप्रतीक्षित चित्रपटही प्रगतीपथावर आहेत. अॅटली कुमार दिग्दर्शित जवान आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी या चित्रपटात शाहरुख काम करत आहे. जवान 2 जूनला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, तर डंकी 22 डिसेंबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने बिग बॉस आणि कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. शाहरुखला फक्त त्याच्या पठाण या चित्रपटाद्वारे त्याच्या चाहत्यांशी थेट संपर्क साधायचा आहे. केवळ शाहरुखच नाही तर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनाही चित्रपटाचे प्रमोशन नाकारण्यात आले आहे.

पठाण चित्रपटाचे मोशन न करपण्याचे कारण काय?- यशराज फिल्म्स कंपनी एका मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर काम करत आहे, यासाठी ते पठाण चित्रपटाच्या स्टारकास्टला प्रमोशनसाठी कुठेही पाठवणार नाहीत. प्रमोशन काळात कोणताही नवा वाद निर्माण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. अलीकडेच यशराज फिल्म्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शाहरुख आणि जॉनचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ते चित्रपट आणि त्यांच्या पात्राबद्दल बोलत आहेत.

पठाण ओटीटीवरही होणार रिलीज - याआधी पठाण चित्रपटाचे डिजिटल हक्क 100 कोटींना विकले गेले आहेत आणि हा चित्रपट 25 एप्रिल २०२३रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत उच्च न्यायालयाने दृष्टिहीनांसाठी काही बदल सुचवले होते. हे बदल फक्त OTT प्रकाशनासाठी देण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे हे बदल पठाणच्या थिएटर प्रदर्शनाला लागू होणार नाहीत. हायकोर्टाने निर्मात्यांना ते सबटायटल्ससह ओटीटीवर रिलीज करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा -Sa Re Ga Ma Winner : 9 वर्षीय जेतशेन सारेगमापा लिटल चॅम्प्सची विजेती, जिंकले १० लाख रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details