महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Raundal marathi movie : 'ख्वाडा' आणि 'बबन'च्या यशानंतर भाऊसाहेब शिंदे झळकणार 'रौंदळ' चित्रपटात

'ख्वाडा' आणि 'बबन'च्या यशानंतर भाऊसाहेब शिंदे 'रौंदळ' चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट ३ मार्च २०२३ रोजी रिलीज होणार आहे. 'रौंदळ'च्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर 'बबन'मध्ये डॅशिंग भूमिकेत भाऊसाहेब यांचे दर्शन घडले होते. महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीतील भूमिका साकारणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे याचे नाव घेतले जाते. तो आता 'रौंदळ' या आगामी मराठी व हिंदी चित्रपटात रांगड्या लुकमध्ये दिसणार आहे.

Raundal marathi movie
भाऊसाहेब शिंदे झळकणार 'रौंदळ' चित्रपटात

By

Published : Jan 26, 2023, 12:59 PM IST

मुंबई :भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटच्या निर्मिती संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी 'रौंदळ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवींद्र आवटी, संतोष आवटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केले आहे.

'ख्वाडा' आणि 'बबन'च्या यशानंतर भाऊसाहेब शिंदे झळकणार 'रौंदळ' चित्रपटात


सत्य घटनेवर आधारित : या चित्रपटात भाऊच्या जोडीला नेहा सोनावणे आहे. या चित्रपटातील 'मन बहरलं...' हे प्रेमळ गीत काही दिवसांपूर्वीच रसिकांच्या भेटीला आले असून, या गाण्याला संगीतप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. 'रौंदळ'बाबत दिग्दर्शक गजानन पडोळ म्हणाले की, आजवर ग्रामीण बाजाचे बरेच चित्रपट रिलीज झाले असले तरी या चित्रपटाचा बाज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध दूरवर पसरवणारा असल्याची जाणीव रसिकांना होईल. सत्य घटनेवर आधारलेल्या या कथेत गावातील वास्तव घटनांसह इतरही बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

म्युझिकल सिनेमा : 'रौंदळ'च्या माध्यमातून रसिकांसमोर एक म्युझिकल सिनेमा सादर करण्याचा आमच्या संपूर्ण टिमचा प्रयत्न आहे. भाऊसाहेब शिंदेने साकारलेला नायक आजवर मराठी चित्रपटांमध्ये पाहिलेल्या नायकापेक्षा खूप वेगळा आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना हा चित्रपट प्रेक्षकांना बरेच काही देऊन जाईल. या चित्रपटात यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, संजय लाकडे, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकार आहेत. सुधाकर शर्मा, डॅा. विनायक पवार, बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलेल्या गीतरचना वैशाली माडे, सोनू निगम, जावेद अली, गणेश चंदनशिवे, स्वरूप खान, दिव्या कुमार, हर्षित अभिराज यांनी गायल्या आहेत.

चित्रपट प्रेक्षकांना बरेच काही देणार :राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावरने या चित्रपटाचे सिंक साऊंड आणि डिझाईन केले आहे. डिओपी अनिकेत खंडागळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, फैझल महाडीक यांनी एडिटींग केले आहे. विक्रमसेन चव्हाण या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक आहेत. रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिले असून, नेहा मिरजकर यांनी कोरिओग्राफी केली आहे. समीर कदम यांनी मेकअप, सिद्धी योगेश गोहिल यांनी कॅास्च्युम, मोझेस फर्नांडीस यांनी फाईट सीन्स, गजानन सोनटक्के यांनी कला दिग्दर्शनचे काम पाहिले आहे. मंगेश भिमराज जोंधळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी चोख बजावली असून डीआय वॅाट स्टुडिओमध्ये, डीआय कलरीस्ट श्रीनिवास राव यांनी, व्हिएफएक्स सुपरवायजिंग सतिश येले यांनी तर अ‍ॅानलाईन एडीटींग माही फिल्म्स लॅबचे विक्रम आर. संकपाळे यांनी केले आहे.

हेही वाचा :शाहरुख आणि दीपिकाच्या अ‍ॅक्शन अवतारवर चाहते फिदा, सलमाननेही उजळला पडदा

ABOUT THE AUTHOR

...view details