ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आदित्य सरपोतदार यांच्या ‘उनाड’ ची ६२ व्या झ्लिन चित्रपट महोत्सवासाठी झाली निवड! - झ्लिन चित्रपट महोत्सव

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ( Director Aditya Sarpotdar ) यांचा आगामी चित्रपट आहे ‘उनाड’. या चित्रपटाची निवड झालीय झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात. युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. जिओ स्टुडिओज निर्मित मराठी चित्रपट 'उनाड' ( Unad ) हा चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival), दाखविला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी उनाडची निवड
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी उनाडची निवड
author img

By

Published : May 3, 2022, 4:18 PM IST

मुंबई - ‘फास्टर फेणे’, ‘झोंबिवली’ सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ( Director Aditya Sarpotdar ) यांचा आगामी चित्रपट आहे ‘उनाड’. या चित्रपटाची निवड झालीय झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात. युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. जिओ स्टुडिओज निर्मित मराठी चित्रपट 'उनाड' ( Unad ) हा चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival), दाखविला जाणार आहे.

in article image
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी उनाडची निवड

झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगभरातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा महोत्सव आहे. हा एक अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम आहे, जो मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी चित्रपट निर्मितीच्या नवीन संधींची ओळख करून देतो. मागील महोत्सवात सुमारे एक्याऐंशी हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अकरा हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या महोत्सवाला जगातील ५२ देशांतील ३१० चित्रपटांचा समावेश होता.

'उनाड' ही महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या हर्णे येथील तीन तरुण मुलांची कथा आहे. शुभ्या, बंड्या आणि जमील हे तीन मित्र आहेत जे आपला वेळ गावात हुंदडण्यात घालवतात. त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नाही. स्थानिक त्यांना गावातील उनाड मुले समजत असल्याने, तिन्ही मुले अडचणीत येतात. त्यांच्या आयुष्यातील त्या टप्प्याची ही कहाणी आहे, जी त्यांना कायमची बदलते.

चित्रपटाच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाला, “महत्त्वाच्या आणि संबंधित युवा वर्गात 'उनाड' ची निवड होणे ही चित्रपटासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही कोळी समाजातील सध्याच्या तरुणांचा वास्तववादी विचार करण्याचा प्रयत्न केला असून या चित्रपटात तीन तरुणांचा प्रवास आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या महोत्सवात 'उनाड'ची निवड होणे ही आमच्या टीमच्या प्रवासाची पावती आहे. आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहात आहोत विशेषतः या महोत्सवाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांची.''

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी उनाडची निवड

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित या चित्रपटात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भरते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हेही वाचा -Nargis Dutt Memorial Day : दिवंगत सदाबहार अभिनेत्री नर्गिस दत्त स्मृतिदिन पाहा दुर्मिळ फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details