मुंबई - Aditya Roy Kapur attends KGHK screening : अभिनेता आदित्य रॉय कपूरने त्याची कथित मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडेचा आगामी चित्रपट 'खो गये हम कहाँ' च्या स्क्रीनिंगला बॉलिवूडमधील अनेक स्टार्ससह हजेरी लावली. मुंबईत सोमवारी रात्री झालेल्या स्क्रिनिंगमधील आदित्य आणि अनन्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झळकले आहेत.
यावेळी आदित्य कॅज्युअल चेकर्ड ग्रे शर्ट आणि ग्रे डेनिम्समध्ये स्पोर्टी कॅपसह हजर होता. अनन्याने तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी पांढरा क्रॉप टॉप घातला होता. हा टॉप तिने मिनी ब्लॅक-ब्लू डेनिम स्कर्ट आणि ब्लॅक ब्लेझरसह जोडला होता. आदित्य शिवाय अनन्याच्या बेस्ट फ्रेंड्स सुहाना खान आणि शनाया कपूर यादेखील हजर होत्या.
अलिकडेच आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर यांनी लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण सीझन 8 च्या एपिसोडमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी करणने आदित्यला अनन्याच्या रिलेशनशिपबद्दलचे काही प्रश्न विचारले होते. त्यावर त्याने मजेशीर उत्तर देताना म्हटले होते की तुम्ही मला रहस्ये विचारु नका कारण मी खोटं बोलू शकत नाही.
जेव्हा अनन्या पांडेने सारा अली खानसोबत करण जोहरच्या या टॉक शोमध्ये आली होती तेव्हा करणने साराला विचारले की अनन्याकडे अशी कोणती गोष्ट आहे जी तिच्याकडे नाही. यावर साराने पटकन उत्तर दिले, 'नाईट मॅनेजर'. अनन्याचा कथित बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर याची अलिकडेच प्रसारित झालेली 'नाईट मॅनेजर' ही वेबसीरिज चर्चेत आहे. साराचे उत्तर ऐकून अनन्याने उत्तर दिले, "मला अनन्या कोय कपूर असल्याचे खूप वाटत आहे."