मुंबई : ‘आदिपुरुष’ या वादग्रस्त चित्रपटातील राम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्यासह इतर कलाकारांचे वाईट संवाद आणि खराब व्हीएफएक्समुळे देशवासीयांच्या धार्मिक श्रद्धा दुखावल्या आहेत. या चित्रपटामुळे रामभक्त प्रचंड संतापले असून ते या चित्रपटाला सनातन धर्माचा आणि संस्कृतीचा विध्वंस म्हणत आहेत. अशा परिस्थितीत देशव्यापी संतापानंतर चित्रपटाचे संवाद बदलले जात आहेत. आता 'तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की' हा चित्रपटातील सर्वात वादग्रस्त संवाद बदलण्यात आला आहे. जाणून घ्या आता या वादग्रस्त संवादाची कुठल्या संवादाने जागा घेतली आहे. आणि आता नवीन संवाद प्रेक्षकांना आवडणार की नाही. यावर चित्रपट निर्मात्यांचे लक्ष आहे.
नवीन संवाद :आदिपुरुष या चित्रपटातील वादग्रस्त संवाद 'तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और जलेगी भी तेरे बाप की' आता हा चित्रपटात संवाद सादर होत आहे, मात्र आता 'कपडा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग भी तेरी लंका की और जलेगी भी तेरी लंका ही'. असा नवीन संवाद लिहण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात हा चित्रपट बघायला चित्रपगृहात प्रेक्षक जाणार की नाही, यावर आता शंका आहे.
चित्रपटातील इतर वादग्रस्त संवाद :
यह लंका का क्या तेरी बुआ का बगीचा है, जो यहां हवा खाने चला आया'.