महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Adipurush box office collection: 'आदिपुरुष' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ५व्या दिवशी मोठी घसरण - क्रिती सॅनॉन

तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आदिपुरुष रिलीजच्या पाचव्या दिवशी केवळ देशांतर्गत सर्व भाषांमध्ये 10.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी आदिपुरुष हा चित्रपट पाहण्यासाठी फार कमी प्रेक्षक आले होते.

Adipurush box office collection
आदिपुरुष बॉक्स ऑफिस कलेक्शन

By

Published : Jun 21, 2023, 12:42 PM IST

मुंबई : वादग्रस्त चित्रपट आदिपुरुष प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. प्रभास, क्रिती सॅनॉन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुष या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये या आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर कमालीची घट झाली आहे. मंगळवारी, यात आणखी घसरण झाली, सर्व भाषांमधील देशांर्तग एकूण संकलन 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पाचव्या दिवशी आदिपुरुष हा चित्रपट पाहण्यासाठी फार कमी प्रेक्षक आले होते. तर दुसरीकडे, चित्रपटातील वादग्रस्त संवाद असल्याने प्रेक्षकांनी, राजकीय नेत्यांनी आणि सेलेब्रिटींनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्याचे काम सध्याला सुरू आहे. आदिपुरुष या चित्रपटाने संपूर्ण राम लाट उद्ध्वस्त केली.

आदिपुरुष कलेक्शन :आदिपुरुष पांचव्या दिवसाची कमाई : तब्बल 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आदिपुरुष रिलीजच्या पाचव्या दिवशी केवळ देशांतर्गत सर्व भाषांमध्ये 10.80 कोटी रुपयांची कमाई केली. आठवड्याच्या शेवटी 220 कोटी रुपयांच्या कमाईनंतर आदिपुरुषने सोमवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 20 कोटी रुपयांची कमाई केली. प्रोडक्शन बॅनर टी - सीरीज नुसार, सोमवारपर्यंत चित्रपटाची जागतिक एकूण कमाई 375 कोटी रुपये होती. दरम्यान एका मुलाखतीत, वितरक-प्रदर्शक अक्षय राठी यांनी रविवारी सांगितले की, आदिपुरुष चित्रपटाच्या तिकीट खिडकीवरील व्यवसायात 65 टक्के घसरण झाली आहे. पुढे ते म्हणाले, 'प्रेक्षकांचे हे स्वतःचे मत आहे, आणि आपण ते स्वीकारले पाहिजे, लोकांना चित्रपट न आवडल्याने ही घसरण झाली आहे, हे दुर्दैव आहे. 65 ते 70 टक्क्यांनी घट झाली आहे.' असे त्यांनी सांगितले. तर एवढ्या मूठभर कमाईने बॉक्स ऑफिसवर आपली लाज वाचवणे आदिपुरुषालाही अवघड झाले आहे.

आदिपुरुष चित्रपटावर बंदी :अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया यांच्यासह रामायण शोमधील टेलिव्हिजन कलाकार तसेच महाभारतमधील मुकेश खन्ना यांनी विविध कारणांसाठी आदिपुरुषांवर टीका केली आहे. दरम्यान, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) या व्यापारी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आदिपुरुषावर बंदी घालण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा :

  1. Karan Johar News : करण जोहरचा ब्रिटिश संसदेकडून गौरव, ग्लोबल एंटरटेनमेंटमध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सन्मान
  2. Ameesha Patel News: अमिषा पटेल आज रांची न्यायालयात राहणार हजर, काय आहे नेमके प्रकरण?
  3. Baap Manus motion poster : बाप माणूस चित्रपट प्रदर्शनसाठी सज्ज, ऑगस्टमध्ये होणार रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details