मुंबई :ओम राऊतचा 'आदिपुरुष' चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे, ज्यासाठी चाहते आणि कलाकार फार दिवसांपासून वाट पाहत होते. कोणत्याही चित्रपटाचे खरे समीक्षक हेच प्रेक्षक असतात. प्रभासच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दिवसाचा पहिला शो हिट झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी चित्रपटाबद्दल त्यांचे मत ट्विटरवर व्यक्त केले आहे. या चित्रपटाबद्दल वापरकर्त्यांनी काही तासाच निर्णय दिला आहे. काहीजणांना रामायणला दिलेला आधुनिक टच आवडला आहे, तर काहींनी चित्रपटातील खराब व्हिएफएक्सबद्दल तक्रार केली आहे.
वापरकर्त्यांचे मत :या चित्रपटाला बघितल्यानंतर एका वापरकर्त्यांने लिहले, 'आदिपुरुष' हा ओकेश, व्हिएफएक्ससह खूप चांगला चित्रपट आहे. मुख्य पात्रांची स्क्रीन प्रेझेन्स खूप चांगली होती, काहीही दोष देण्यासारखे नाही. ओम दिग्दर्शन उत्कृष्ट आणि काही दृश्य व्हिएफएक्स उत्कृष्ट होते, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका... ओम तुम्ही खरोखरच हा चित्रपट चांगला सादर केला. काही दृश्ये निराशजनक होती पण चित्रपट नाही. त्यामुळे चित्रपट पहा..' तर आणखी एका वापरकर्त्यांने लिहले, 'आदिपुरुष' रिव्हूव्ह: अतिशय वाईट चित्रपट तुम्ही 1800 कोटी क्लबचा अभिनेता प्रभासला या पद्धतीने हाताळता का? प्रभासचा चाहता म्हणून, मी अशा कडवट चित्रपटांना प्रोत्साहन देत नाही' 'आदिपुरुष' हा पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित आहे. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रभास हा राघव, क्रिती सेनॉन जानकी सनी सिंग लक्ष्मण आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकले आहे.