मुंबई - अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन 1 नोव्हेंबर 2022 रोजी तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'देवदास'च्या पारोपासून ते 'हम दिल दे चुके'ची नंदिनी ते 'मोहोब्बतें'तील मेघापर्यंत, तिने तिच्या सहज सुंदर अभिनय आणि अलौकिक सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य केले आहे.
अभिनेत्री ऐश्वर्याने 1994 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने और प्यार हो गया या चित्रपटातून 1997 मध्ये बॉलिवूड पदार्पण केले. तिला अनेकवेळा 'जगातील सर्वात सुंदर स्त्री' म्हणून औळखले जाते. और प्यार हो गया चित्रपटापासून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आली आहे. हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास आणि जोधा अकबर हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.
तिचा अभिनयाचा प्रवास केवळ बॉलीवूडपुरता मर्यादित राहिला नाही कारण तिने हॉलीवूडमध्ये ब्राइड अँड प्रिज्युडिस, प्रोव्होक्ड, यासह इतर काही चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.