महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 11, 2022, 4:43 PM IST

Updated : Nov 11, 2022, 5:11 PM IST

ETV Bharat / entertainment

अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंशीचे जिममध्ये वर्कआउट करताना निधन

अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंशी यांचे जिममध्ये वर्कआउट करताना निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाल्यामुळे मनोरंजना जगतात शोकलहर पसरली अून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंशी
अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंशी

मुंबई - सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी सकाळपासूनच सिद्धांत अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. असे असूनही तो जिममध्ये गेला. तोही तणावात दिसत होता. जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. सिद्धांतला त्याच्या प्रशिक्षकाने रुग्णालयात नेले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

डॉक्टरांनी सिद्धांत वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले. राजू श्रीवास्तव, दाक्षिणात्य सुपरस्टार पुनित राजकुमार आणि दीपेश भान यांच्यानंतर जिममध्ये वर्कआउट करताना अभिनेत्याचा झालेला हा चौथा मृत्यू आहे. 'कुसुम', 'वारीस' आणि 'सूर्यपुत्र करण' या मालिकांसाठी हा अभिनेता प्रसिद्ध आहे. टीव्ही अभिनेता जय भानुशालीने चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे. सिद्धांत वीर यांच्या पश्चात पत्नी एलिशिया राऊत आणि दोन मुले आहेत. फिटनेसबाबत सिद्धांत खूप दक्ष होता.

हास्य कलाकार सुनील पाल

हास्य कलाकार सुनिल पाल यांनी या बातमीला दुजोरा देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटलंय, ''आणखी एक दुःखद बातमी आली आहे. टीव्ही अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंश याचं वयाच्या ४६ व्या वर्षा निधन झालं आहे. ते जीममध्ये व्यायाम करत असताना ही घटना घडली. काय झालंय या बॉलिवूडला, जगाला कळंत नाही, एकापेक्षा एक दुःखद घटना घडत आहेत. कोणती आराधना, प्रार्थना करावी तेच कळत नाही. या कलाकारांच्या कुटुंबीयांचे रक्षण कर प्रभू. सिध्दांतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करत आहे. त्याच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकत त्यांना परमेश्वर देवो.'' असे सुनिल पालने म्हटलं आहे.

जय भानुशाली यांनी दुजोरा दिला, सोशल मीडियावर वाहिली श्रध्दांजली

जय भानुशाली यांनी दुजोरा दिला- सिद्धांत वीरचा फोटो शेअर करताना जय भानुशालीने लिहिले, 'भाऊ, तू खूप लवकर निघून गेलास.' जय भानुशाली यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सिद्धांत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, मला ही बातमी एका कॉमन फ्रेंडकडून मिळाली. जिममध्ये कसरत करत असताना त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा -'मूव्हिंग इन विथ मलायका' मधून मलायका अरोराचे ओटीटी पदार्पण!

Last Updated : Nov 11, 2022, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details