महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Nana Patekar slaps fan : नाना पाटेकरनं चाहत्याच्या कानाखाली वाजवली, व्हिडिओ व्हायरल - गदर 2 फेम दिग्दर्शक अनिल शर्मा

अभिनेता नाना पाटेकरनं वाराणसीमध्ये सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला थप्पड मारलीय. त्याचा हा सनसनाटी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

Nana Patekar slaps fan
नाना पाटेकरनं चाहत्याच्या कानाखाली वाजवली

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 2:19 PM IST

Updated : Nov 15, 2023, 3:17 PM IST

वाराणसी- अभिनेता नाना पाटेकर सध्या वाराणसीत जर्नी चित्रपटाचं शूटिंग करतोय. या दरम्यान नानाची सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या फॅनला नानानं थप्पड मारल्यानं नव्या चर्चेला सुरूवात झालीय. एवढंच नाही तर त्याच्यासोबत उभ्या असलेल्या क्रू मेंबरनं त्या तरुणाची मान पकडून त्याला तेथून ढकलून दिलं. ही संपूर्ण घटना कोणीतरी त्याच्या फोनवर रेकॉर्ड केली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तो नाना पाटेकरांच्या या वागण्याचा निषेध करतोय. चाहत्यांसोबतचं त्याचं असं वागणं कुणालाही सहन झालेलं नाही. हा व्हिडिओ मंगळवारचा असल्याचं सांगण्यात येतंय.

गदर-2 फेम दिग्दर्शक अनिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटाचं शुटिंग करण्यात गुंतलेत. या चित्रपटाचे नाव आहे 'जर्नी'. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माही काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग वाराणसीपासून सुरू आहे. यामध्ये सर्वात आधी अस्सी घाटावर शूट सुरू करण्यात आले. या चित्रपटातील एका भक्तिगीताचे चित्रीकरण येथे होत आहे. यावेळी दशाश्वमेध चौकात काही दृश्यांचे शुटिंग सुरू होते. यावेळी अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह चित्रपटाचा संपूर्ण क्रू उपस्थित होता. नाना पाटेकर यांना पाहताच त्यांचे चाहतेही तेथे पोहोचले होते आणि त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा प्रयत्न केला.

नाना पाटेकरनं चाहत्याला मारली थप्पड - मिळालेल्या माहितीनुसार, दशाश्वमेध चौकात चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग सुरू असताना नाना पाटेकर बाजारात फिरतानाचा सीन शूट होत असताना मोठी गर्दी झाली होती. नानाला पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. यासाठी नाना पाटेकर चित्रपटातील गेटअपमध्ये उपस्थित होता. दरम्यान, चाहते त्यांच्या फोनवर त्याच्यासोबत सेल्फी घेत होते. या प्रकारामुळे नाना वैतागला. त्याच्या सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याच्या डोक्यावर त्यानं चापटी मारली. बाजूलाच उभा असलेल्या चित्रपटाच्या क्रू मेंबरने त्या तरुणाची मान पकडली आणि त्याला ठकलून दिलं. हा सारा प्रसंग कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय.

व्हिडिओ वेगाने व्हायरल : नानानं चाहत्याला थप्पड मारण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यानंतर नाना पाटेकरला चांगलेच तोंड द्यावे लागत आहे. त्याच्या चाहत्यांसोबतच्या वागण्यावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर दशाश्वमेध चौकात सुमारे तासभर शूटिंग सुरू होतं. यासोबतच वाराणसीच्या शशी घाट, तुळशी घाट, दशाश्वमेध घाट येथेही काही दृश्ये शूट करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीमध्ये देव दिवाळीपर्यंत या चित्रपटाचे शूटिंग सुरू राहणार आहे. यासोबतच अनेक घाटांवर चित्रीकरण करण्यात येणार असून, त्यात संस्कृती दाखवण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. Ind Vs Nz Semifinal : रजनीकांत ते बिग बी; भारत न्युझीलंड उपांत्य सामन्याला 'हे' दिग्गज सेलिब्रिटी सामन्याला लावणार हजेरी

2.World Cup 2023: भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मैदानावर झळकणार रजनीकांत

3.Tiger 3 Box Office: सलमान आणि कतरिनाच्या 'टायगर 3' ची तिसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिवाळी

Last Updated : Nov 15, 2023, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details