महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिजीत सावंतमुळं पक्षपात झाला, उपविजेत्या अमित सानाची इंडियन आयडॉलवर टीका - अमित सानाची इंडियन आयडॉलवर टीका

Abhijeet Sawant and Amit Sana : 'इंडियन आयडॉन' हा सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो सध्या चर्चेत आला आहे. उपविजेता ठरलेल्या अमित सानानं 20 वर्षांनंतर दावा केलाय की 'राजकीय प्रभावामुळं अभितीत सावंतला विजयी करण्यात आलं होतं. त्यानंतर विजेता अभिजीतनं अमित सानाच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Abhijeet Sawant and Amit Sana
अभिजीत सावंत आणि अमित साना

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 2:32 PM IST

मुंबई - Abhijeet Sawant and Amit Sana : ''इंडियन आयडॉन'' हा सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो जवळपास 20 वर्षांपासून अनेकांच मनोरंजन करत आहे. अभिजीत सावंत हा पहिल्या सत्राचा विजेता तर अमित साना उपविजेता ठरला होता. दरम्यान आता अमितनं आरोप केला आहे की, 'इंडियन आयडॉल' फिनाले होण्याच्या 2 दिवस आधी त्याची वोटिंग लाईन बंद करण्यात होती, तर अभिजीत सावंतची वोटिंग लाईन चालू होती. यामुळे तो विजेता ठरला. त्यानंतर आता अभिजीत सावंतनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. ''इंडियन आयडॉल''चा पहिला विजेता अभिजीत सावंतनं एका दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं की, ''अमित खूप साधा आहे. मी अनेक शोमध्ये भाग घेतला आहे. कोणतीही स्पर्धा हरण्याची अनेक कारणे असतात. ही फक्त एक गोष्ट नाही. कदाचित त्याचे चाहते भावूक झाल्यामुळं त्यानं असं बोललं असावं''.

अभिजीत सावंतनं अमित सानाचं आरोप फेटाळून लावले :अमित साना यांचे आरोप फेटाळून लावत अभिजीतनं पुढं सांगितलं, ''संपूर्ण भारत त्यावेळी दोघांना मत देत होते, त्यामुळं एकाला मते मिळत आहेत आणि दुसऱ्याला मत मिळत नाही हे शक्य नाही. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर या शोचे निरीक्षण केले जात होतं'. अभिजीत म्हणाला की, ''आता 20 वर्षांनंतर यावर बोलण्यात अर्थ नाही.'' हा सीझन फराह खान आणि सोनू निगम आणि अन्नू मलिकनं जज केला होता.

अमित सानानं केला आरोप :अमितनं पुढं सांगितलं, 'जेव्हा शिल्पा शेट्टीनं अभिजीतच्या स्मितहास्याची प्रशंसा केली, तेव्हापासून सगळेच पसंत करू लागले. त्यानंतर त्याला अधिक मत मिळू लागले. राहुल वैद्यच्या वागणुकीबद्दल अमितनं सांगितलं की, राहुल नेहमी फक्त स्वतःचाच विचार करत होता. तो सगळ्यांशी खूप वाईट वागायचा. या शोदरम्यान राहुलमध्ये आणि त्याच्यात अनेकदा भांडणे झाली होती. याशिवाय अमितनं शोच्या जजबद्दलही धक्कादायक गोष्ट सांगत म्हटलं, शोची जज फराह खानशी खूप बोलायची, पण जेव्हा तो तिला काही विचारायचा तेव्हा, ती फारशी प्रतिक्रिया देत नव्हती. ती नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची.राजकीय प्रभावामुळं अभितीतला विजयी करण्यात आलं,'' असंही तो पुढे म्हणाला.

अभिजीत सावंत 'या' शोमध्ये झळकला :'इंडियन आयडॉल 1' जिंकल्यानंतर, अभिजीत आपला पहिला एकल अल्बम 7 एप्रिल 2005 रोजी रिलीज केला. त्याच वर्षी, त्यानं 2005 च्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातील काही गाण्यांना आवाज दिला. त्याचा दुसरा अल्बम 'जुनून' 2007 मध्ये आला. रिअ‍ॅलिटी टेलिव्हिजनमधील त्यांचा सहभाग तिथेच संपला नाही, त्यानं 2008 मध्ये स्टार प्लसवरील क्लिनिक 'ऑल क्लियर जो जीता वही सुपरस्टार'मध्ये भाग घेतला, जिथे तो प्रथम उपविजेता ठरला. याशिवाय अभिजीत आणि त्यांची पत्नी शिल्पानं 2008 मध्ये डान्सिंग रिअ‍ॅलिटी शो 'नच बलिए'च्या चौथ्या सीझनमध्येही भाग घेतला होता.

हेही वाचा :

  1. यंदाचा विश्वचषक भारतच जिंकणार, सलमान खानचा विश्वास
  2. दीपिका पदुकोण-रणवीर सिंग युरोप दौऱ्यावरुन मुंबईला परतले, रणबीर कपूरही झाला स्पॉट
  3. डेव्हिड बेकहॅमसोबतच्या फोटोवरुन खिल्ली उडवणाऱ्या हर्षवर्धन कपूरनं दिलं शांत उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details