मुंबई -Aamir Khan at Ganpati pooja : गणपतीचं आगमन महाराष्ट्रात 19 सप्टेंबर रोजी झालं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी एकमेकांच्या निवासस्थानी जाऊन पूजा सोहळ्यात सहभागी होतना दिसतात. दरम्यान, आता बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा 26 सप्टेंबर रोजी राजकारणी आशिष शेलार यांच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचला होता. आमिरनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो गणपतीचं दर्शन करताना दिसत आहे. यावेळी आशिष शेलार यांनी आमिर खानला पुष्पगुच्छ आणि महादेवाची एक प्रतिमा दिली.
यूजर भडकले आमिर खानवर : इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या आमिरच्या व्हिडिओला काही लोक विरोध करत आहे. काहीजण या व्हिडिओवर कमेंट करत त्याला खडेबोल सुनावत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरनं लिहलं, एका क्षणात हिंदू, क्षणात मुस्लिम, क्षणात माझ्या देशात असहिष्णुता आणि क्षणात माझा देश महान.. अभिनेत्यांना जात नसते हे खरे आहे. त्यानंतर दुसऱ्या एकानं लिहलं, 'पीके आपला रिमोट मागण्यासाठी जात आहे' आणखी एकानं लिहलं, 'हे लोक फेमसाठी आणि पैशासाठी काही करू शकतात यांना कुठलीच जात नाही' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.
आमिर खानचं वर्कफ्रंट :आमिरच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं दिग्दर्शक राजकुमार संतोषीसोबत दोन चित्रपटांसाठी साइन केले आहेत. दोन चित्रपटांपैकी एका चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत असेल आणि दुसऱ्या चित्रपटात तो निर्माता म्हणून काम करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सनी देओल आणि राजकुमार संतोषी काही दिवसांपासून एका चित्रपटावर चर्चा करत होते. आरएस प्रसन्ना दिग्दर्शित 'चॅम्पियन्स' या चित्रपटाद्वारे आमिर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2024 मध्ये सुरू होईल. हा चित्रपट 2024च्या ख्रिसमसच्या वीकेंडमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. यासोबतच अभिनेता अविनाश अरुण दिग्दर्शित उज्ज्वल निकम बायोपिकवरही आमिर काम करत आहे.
हेही वाचा :
- Tumse Na Ho Payega Screening : 'तुमसे ना हो पायेगा'च्या स्क्रिनिंगला कथित लव्हबर्ड्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरची हजेरी पाहा व्हिडिओ
- Parineeti Chopra Raghav Reception : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका झाली लीक...
- Animal movie poster : 'अॅनिमल' चित्रपटामधील बॉबी देओलचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज...