मुंबई - Ira Khan Wedding:आमिर खानची लाडकी आयरा खानचं लग्न झालं आहे. तिन 3 जानेवारीला बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्टात लग्न केलं. कोर्ट मॅरेजनंतर नूपूर आणि आयरा बाहेर आल्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोझ दिली. आता आयरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत नूपुरनं ब्लू कलरची शेरवानी परिधान केली आहे. आयराच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं निळ्या ब्लाउजसह गुलाबी रंगाचा सिल्क पायजामा घातला आहे. यावर तिनं ओढणी घेतली आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसतंय. लग्नातील फोटोमध्ये आमिर खान, किरण राव, रीना दत्ता, आझाद आणि जुनैद हे एकत्र दिसत आहे.
आयरा खानचं लग्न :आयराचे फॅमिलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. याशिवाय आयरानं तिच्या दोन्ही भावांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. जुनैदने ग्रे कलरचा सूट परिधान केला आहे, तर आझादनं निळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला आहे. कोर्ट मॅरेजनंतर हे जोडपे आपल्या कुटुंबासह उदयपूरला रवाना होणार आहे. आयराच्या लग्नात आमिर खान हा पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसला. किरण स्टेजवर जाताच आमिर तिला भेटायला आला. तेव्हा दोघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.