मुंबई -सुपरस्टार आमिर खान ( Aamir Khan ) आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता ( first wife Reena Dutta ) आपली मुलगी इरा खानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आले. त्यांची मुलगी इरा खानच्या वाढदिवसाच्या ( Ira Khan birthday ) पार्टीत पूर्व पती पत्नीने भरपूर आनंद घेतला. त्यांचे काही फोटो प्रसिध्द झालेत, यात ते इराचा वाढदिवस एकत्र साजरा करताना दिसत आहेत.
एका फोटोत आमिर आणि रीना आनंदाने लेक इरा केक कापताना पाहात आहेत. आमीरची दुसरी पत्नी किरण राव हिचा मुलगा आझाद हा देखील या प्रसंगी आमिरसोबत उभा आहे. व्हायरल फोटोंमध्ये, इरा तिच्या पूल साइड बर्थडे बॅशसाठी बिकिनी परिधान केलेली दिसत आहे.
इराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यानेही आपल्या लेडीलव्हच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. इराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नुपूरने लिहिले, "हॅपी बर्थडे माय लव्ह. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो."
आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. मुलगी इरा आणि मुलगा जुनैद खान या दोघांच्या जन्मानंतर धोघांनी लग्नाच्या 16 वर्षानंतर घटस्फोट घेतला. नंतर आमिरने किरण राव हिच्याशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा आझाद राव खान आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतर आमिर आणि किरणने गेल्या वर्षी त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती.
हेही वाचा -प्रियंका चोप्राची लेक १०० दिवसानंतर रुग्णालयातून परतली, पाहा पहिली झलक