मुंबई - बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया आणि तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेग्रोयर यांचा एंगेजमेंट समारंभ कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला. यापूर्वी बालीमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला या दोघांनी एंगेजमेंट केली होती. मुंबईत पार पडलेल्या समारंभातील काही फोटो आलियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
स्टार स्टडेड एंगेजमेंट पार्टीतील फोटो शेअर करताना आलियाने पांढऱ्या हार्ट इमोजीसह 'काल रात्री बद्दल', असे कॅप्शन दिले. तिने काही सोलो फोटोसह शेनसोबतचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटोही शेअर केले आहेत. यातील एका फोटोत ते चुंबन घेतानाही दिसत आहेत.
आलिया कश्यपने गुरुवारी तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेग्रोयर याच्यासोबत एंगेजमेंट केली. भरपूर आकर्षक पोशाख परिधान करुन हजर असलेल्या पाहुण्यांसह हा सोहळा भरपूर भरपूर ग्लॅमरस होता. या एंगेजमेंट पार्टीची थीम सजवटीपासून केकपर्यंत व्हाइट कलरची होती. यात वाग्दत वधू आणि तिचा होणारा वर पांरपरिक ड्रेमध्ये दिसत होते.
आयेशा कश्यप ही एक यूट्यूबर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याची पहिली बायको आरती बजाज यांची मुलगी आहे. आयेशाने आपल्या प्रयकराचे आभार मानत एक सुंदर नोह लिहिली आहे. ती म्हणते, 'हे घडून गेले. माझा प्रिय मित्र, माझा जीवाभावाचा दोस्त आणि आता माझा होणारा नवरा. तू माझ्या जीवनाचे प्रेम आहेस. खरे आणि विनाशर्त प्रेम कसे असते हे दाखवून दिल्याबद्दल तुझे आभार. तुला होय म्हणणं हे माझ्यासाठी पूर्वी कधीही न केलेली सोपी गोष्ट होती आणि उर्वरित आयुष्य मी तुझ्यासाठी घालवण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करु शकणार नाही. माझे तुझ्यावरील कायम प्रेम राहील.'