मुंबई- बॉलिवूडचा दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात आधीच स्थान निर्माण केले आहे. त्याची अभिनय शैली प्रेक्षकांना सर्वाधिक आकर्षित करते. आता नवाजुद्दीनच्या बाबतीत एका नव्या चर्चेला सुरुवात झालीय की त्याने स्वतःचा स्टुडिओ उभारला आहे. कारण स्टुडिओबाहेर बसलेला त्याचा फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता त्याचे चाहते त्याला विविध प्रश्न विचारत आहेत.
नवाजने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत आपला मोठा आनंद शेअर केला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेता स्टुडिओबाहेर एका बेंचवर बसलेला दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, 'माझ्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल'. हा फोटो पाहून चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. नवाजने स्टुडिओ उभा केलाय, की अॅक्टिंग क्लास की प्रोडक्शन हाऊस.. असा प्रस्न चाहत्यांना पडले असून ते नवाजुद्दीनला याबद्दल विचारणा करत आहेत.
मात्र अभिनेत्याने अद्यापही त्याच्या स्वप्नावरील पूर्णपणे पडदा हटवला नाही. पण नवाज नुकताच चित्रपट बनवण्यासाठी घर विकणार असल्याचं सांगत होता. आपल्या चित्रपटाला थिएटर्स मिळत नसल्याची चर्चा पसरली असताना नवाज हे बोलला होता.
नवाजचा आगामी चित्रपट?- नवाजुद्दीन स्टारर 'हड्डी' या चित्रपटाची घोषणा यावर्षी 23 ऑगस्ट रोजी झाली. पुढील वर्षी (2023) हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचेही सांगण्यात आले. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली आणि एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये नवाजुद्दीन एका सुंदर महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. नवाजुद्दीनचे पात्र समोर आले असून चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रे समोर आली आहेत. या चित्रपटात नवाज एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.