हैदराबाद :लास वेगासमधील MGM ग्रँड गार्डन एरिना येथे संगीत जगातील मानाचा 'ग्रॅमी अवॉर्ड्स 2022' आयोजित करण्यात आला होता. ऑस्कर 2022 प्रमाणे, प्रसिद्ध कॉमेडियन ट्रेव्हर नोहसह अनेक कलाकार उपस्थित होते. क्रिस रॉकने हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथच्या पत्नीबद्दल मजा केल्याने स्मिथने चिडून रॉकच्या कानशिलात लगावली होती. विल स्मिथच्या या कृतीची ग्रॅमी अवॉर्ड्स २०२२ मध्ये जोरदार टीका करण्यात आली.
कॉमेडियन ट्रेव्हर नोहने 64 व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2022 चे समारंभाची सुरुवात केली आणि विल स्मिथमे केलेल्या कृतीची खिल्ली उडवली, 'आम्ही तोंडातून लोकांची नावे काढणार आहोत'. यावरून नोहा विल स्मिथची चेष्टा करत आहे, असे सर्व प्रेक्षकांना समजले.
लेव्हरनेही केला यावर विनोद
अमेरिकन अभिनेता, होस्ट, दिग्दर्शक आणि लेखक लेव्हर बर्टननेही विल स्मिथ-ख्रिस रॉक स्लॅप स्कँडलवर विनोद केला. तो म्हणाला, 'मी तुम्हा सर्वांना सांगतो की, आमचा पुढचा विनोदी कालाकार आहे. तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते माहित असेल'. 'मग मला सगळ्यांना सावध करायला हवे, तुमच्या जागेवर बसून हात जवळ ठेवावेत, बरं का? बर्टनने पुढे होस्ट नेट बारगात्झे यांची ओळख करून दिली. जो हेल्मेट घालून स्टेजवर येऊन म्हणाला. विनोदी कलाकारांना अवॉर्ड शोमध्ये विनोदासाठी हेल्मेट घालणे बंधनकारक झाले आहे. यावर नाटे बारगात्झे म्हणाले, 'हे फक्त तुझा चेहरा झाकणार नाही.' अमेरिकन गायक, गीतकार, डीजे, अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक अहमीर खलीब थॉम्पसन यानेही विल स्टिम-ख्रिस रॉक स्लॅप स्कॅंडलची खिल्ली उडवली. 'मी हा पुरस्कार देणार आहे. तुम्ही लोक माझ्यापासून 500 फूट दूर राहाल'
हेही वाचा -Oscars slapgate: विल स्मिथने दिला अकादमीच्या सदस्यत्वाचा राजीनामा