मुंबई : यावर्षीचा ग्रॅमी पुरस्कार अनेक पुरस्कारांनी गाजला आणि त्यावर टीकाही झाली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा 64 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारांच्या 'इन मेमोरिअम' विभागात समावेश करण्यात आला नाही. यामुळे चाहते निराश झाले असून त्यांनी ग्रॅमी शोवर टीका केली. सोमवारी लास वेगास येथे पार पडलेल्या 2022 ग्रॅमी पुरस्कार तसेच ऑस्कर सोहळ्यात लता मंगेशकर यांना इन मेमोरियम विभागात स्थान देण्यात आले नाही.
इन मेमोरियम विभाग
ग्रॅमी तसेच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांमध्ये ‘इन मेमोरिअम’ हा विभाग असतो. या विभागात जग सोडून गेलेल्या कलाकारांना श्रध्दांजली वाहण्यात येते. यावेळी ग्रॅमी २०२२ ‘इन मेमोरिअम’ विभागात दिवंगत संगीतकार स्टीफन सोंधेम यांच्या गाण्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंथिया एरिव्हो, लेस्ली ओडोम जूनियर, बेन प्लॅट आणि रॅचेल झेगलर यांनी त्यांची गाणी सादर करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. याशिवाय टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांच्याही आठवणींना उजाळा देण्यात आला. मात्र, त्यांनी दिग्गज गायिका लता मंगेशकर यांना श्रध्दांजली द्यायला विसरले. यामुळे चाहते नाराज आहेत.