अमेरिका - 'अक्वामॅन' आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम अभिनेता जेसन मोमोआच्या कारला अपघात झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेसनची कार दुचाकीस्वाराला धडकली. मात्र या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. गेल्या रविवारी या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अतिशय वेगात होता आणि जेसनच्या कारला धडकला. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस तपास सुरू - हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या तपासात काहीही संशयास्पद समोर आलेले नाही. हा अपघात सकाळी 11 वाजेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वळणावरून कट घेतल्यानंतर दुचाकीस्वाराने लेनमध्ये उडी मारली आणि नंतर थेट जेसनच्या कारला धडक दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारची धडक लागताच दुचाकीस्वार खाली पडला आणि त्याला मदत करण्यासाठी जेसन तात्काळ कारमधून बाहेर पडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात बाइक चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.