महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Raquel Welch passed away : हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री रॅक्वेल वेल्च यांचे निधन

हॉलिवूड अभिनेत्री रॅक्वेल वेल्च यांचे निधन झाले आहे. काही दिवसापासून आजारी असलेल्या रॅक्वेल वेल्च यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

Raquel Welch passed away
Raquel Welch passed away

By

Published : Feb 16, 2023, 3:27 PM IST

मुंबई - हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री रॅक्वेल वेल्च यांचे निधन झाले आहे. काही दिवसापासून आजारी असलेल्या रॅक्वेल वेल्च यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी झळकल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये व सिनेक्षेत्रातील लोकांवर शोककळा पसरली.

रॅक्वेल वेल्च या हॉलिवूडमध्ये आरसपानी सौंदर्यसाठी ओळखल्या जात असत. बोल्ड आणि ब्युटिफुल असलेल्या रॅक्वेल यांचा जगभर मोठा चाहता वर्ग आहे. आजारपणामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरुन मिळाल्यानंतर अनेकांनी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रॅक्वेल वेल्च या गेली ५ दशके हॉलिवूड चित्रपटात कारकिर्द गाजवत होत्या. टीव्ही मालिकांसह सुमारे ३० हॉलिवूड चित्रपटात त्यांनी देखणी अभिनेत्री म्हणून काम केले. 1974 च्या द थ्री मस्केटियर्समधील भूमिकेसाठी त्यांना मानाचा आंतरराष्ट्रीय ग्लोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

रॅक्वेल वेल्च यांनी अभिनेत्री म्हणून १९६० चे दशक गाजवले. जबरदस्त सौंदर्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय लैंगिक प्रतीक बनल्या होत्या. या दरम्यान त्यांनी वन मिलियन इयर्स बीसी या चित्रपटात साकारलेली गुहेतील स्त्रीची भूमिका संस्मरणीय ठरली होती.

अभिनेत्री रॅक्वेल वेल्च यांचा जन्म 1940 मध्ये झाला व त्या कॅलिफोर्नियामध्येच लहानाच्या मोठ्या झाल्या. शालेय वयापासूनच त्यांना सौंदर्यामुळे कौतुक वाट्याला आले. अनेक किशोरवयीन सौंदर्य स्पर्धा त्यांनी जिंकल्या व सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बहरत गेलेली रॅक्वेलची कार्किर्द - अभिनेत्री रॅक्वेल वेल्चचा सुरुवातीला डॅलसमधून न्यूयॉर्क शहरात जाण्याचा इरादा होता, परंतु 1963 मध्ये ती लॉस एंजेलिसमध्ये परतले आणि तिने चित्रपट स्टुडिओमध्ये भूमिकांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. या कालावधीत, ती एकेकाळचा बाल अभिनेता आणि हॉलीवूड एजंट पॅट्रिक कर्टिसला भेटली जो तिचा वैयक्तिक आणि व्यवसाय व्यवस्थापक बनला. त्याने वेल्चला लैंगिक प्रतिकात बदलण्याची योजना विकसित केली. लॅटिना म्हणून टाइपकास्टिंग टाळण्यासाठी, त्याने तिला तिच्या पतीचे आडनाव वापरण्यास पटवून दिले.

ए हाऊस इज नॉट अ होम (1964) आणि एल्विस प्रेस्ली या संगीतमय राउस्टाबाऊट (1964) या दोन चित्रपटांमध्ये तिने छोट्या भूमिका केल्या. तिने टेलिव्हिजन मालिका बेविच्ड, मॅक्हेल्स नेव्हा, आणि द व्हर्जिनियनमध्ये छोट्या भूमिका केल्या आणि हॉलिवूड पॅलेस या साप्ताहिक मालिकेत बिलबोर्ड गर्ल आणि प्रस्तुतकर्ता म्हणून दिसली. गिलिगन आयलंड या टेलिव्हिजन मालिकेत मेरी अॅन समर्सच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेल्या अनेक अभिनेत्रींपैकी ती एक होती.

हेही वाचा -Aditya Roy Became Night Manager : आदित्य रॉय कपूर मुंबईतील पॉश हॉटेलचा झाला नाईट मॅनेजर

ABOUT THE AUTHOR

...view details