महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

निलेशच्या केसालाही धक्का लागला तर.....विरोधकांना नारायण राणेंचा इशारा - narayan

नारायण राणे म्हणाले की, काही लोक निलेशच्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्या लोकांना माझे सांगणे आहे, की निलेशच्या वाट्याला कोणी जाऊ नका.

नारायण राणे

By

Published : Apr 13, 2019, 8:26 AM IST

Updated : Apr 13, 2019, 10:58 AM IST

रत्नागिरी - निलेशच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होईल याचा अंदाज करा, असा थेट इशारा नारायण राणे यांनी विरोधकांना दिला. निलेश राणेंच्या प्रचारसभेत ते जाकादेवी येथे बोलत होते. राणे म्हणाले की, तो प्रामाणिकपणे काम करतोय. खासदार नसला तरी गेली ५ वर्षे तो रत्नागिरीत कार्यरत आहे.

रत्नागिरीच्या सभेत बोलताना नारायण राणे

नारायण राणे म्हणाले की, काही लोक निलेशच्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्या लोकांना माझे सांगणे आहे, की निलेशच्या वाट्याला कोणी जाऊ नका. त्याच्या वडिलांचे नाव नारायण राणे आहे. त्यामुळे त्याच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होईल याचा अंदाज करा.

दरम्यान, हातखंबा - रत्नागिरी मार्गावर झालेल्या गाडी तपासणीच्या वेळी वाद झाला होता. त्यामुळे निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर रत्नागिरीचे राजकीय वातारवण चांगलेच तापले होते. राणे म्हणाले, की पोलिसांनी कायद्याचे राज्य जरुर दाखवावे. पण, पक्षपात करू नये. आम्ही नियम तोडत नाही. नियम करणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे कोणी कायदा शिकविण्याचा प्रयत्न करू नये.

Last Updated : Apr 13, 2019, 10:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details