पनवेल - आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. याचे कारण म्हणजे, पनवेल येथील व्ही.के. शाळेतील 'सखी मतदान केंद्र'. या मतदान केंद्रातील सोयीसुविधा पाहुन खरोखर असे मतदान केंद्र असू शकते का? असा प्रश्न मतदारांना पडत आहे.
Loksabha २०१९: मतदानासाठी 'असे' सजले पनवेल येथील 'सखी मतदान केंद्र'
सखी मतदान केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आतमधील परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. आकर्षक स्वागत कमान, रंगीबेरंगी फुगे आणि फुलांचे स्वागत मार्ग, देखावे, उन्हापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी सुंदर मंडपही उभारण्यात आला आहे.
सखी मतदान केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आतमधील परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. आकर्षक स्वागत कमान, रंगीबेरंगी फुगे आणि फुलांचे स्वागत मार्ग, देखावे, उन्हापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी सुंदर मंडपही उभारण्यात आला आहे. मतदारांना रांगेत तात्काळत उभे राहण्याचे काम पडू नये म्हणून मंडपात खूर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांसाठी सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला आहे. जेणेकरून मतदान झाल्यानंतर मतदारांना येथे सेल्फी काढता येईल.
मतदान केंद्रातीलया प्रसन्न वातावरणामुळे मतदार भारावून गेले होते. सखी मतदान केंद्रावरील या सोयीसुविधांचे मतदारांनी भरभरुन कौतुक केले. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी अशाप्रकारचे आयोजन केल्यामुळे आनंद होत असल्याचेही महिलांनी व्यक्त केले. सखी मतदान केंद्राच्या उपक्रमासाठी प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांनी मार्गदर्शन केले.