बीड - पंकजा मुंडे यांचे समर्थक विजय केंद्रे यांनी मतदान अगदी तोंडावर आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसाठी हा धक्का मानला जात आहे. विजय केंद्रे हे भगवान युवासेनेचे संस्थापक असून लोकनेते गोपिनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीचे संचालक आहेत. मुंडे भगिनींना सर्वसामान्य वंजारी नागरिकांची किंमत राहिली नाही, अशी टीका केंद्रे यांनी केली आहे.
मुंडे भगिनींना वंजारी नागरिकांची किंमत राहिली नाही, विजय केंद्रे यांनी आरोप करत सोडली भाजप - beed
बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. केज विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेत आहेत. त्याचवेळी भाजपमधील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा प्रयत्नही ते करत आहेत. केज मतदारसंघातील होळ सर्कलच्या भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. केज विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेत आहेत. त्याचवेळी भाजपमधील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा प्रयत्नही ते करत आहेत. केज मतदारसंघातील होळ सर्कलच्या भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. विजय केंद्रे यांच्यासह बाबासाहेब घुगे, ज्ञानोबा शिंदे, श्रीमंत शिंदे, बिभीषण शिंदे, उत्तरेश्वर राख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
मुंडे भगिनींना वंजारी समाजातील सर्वसामान्य नागरिकांची किंमत राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला असे केंद्रे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. केंद्रे हे केज उपजिल्हा रुग्णालय अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. यामुळे होळ गटात भाजपला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.