अकोला - वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब येथे १० एप्रिल रोजीची आयोजित सभा रद्द करण्यात आली आहे. या सभेला एमआयएमचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे संबोधित करणार होते. ओवैसींची सभा का रद्द झाली याचे कारण कळू शकले नाही. ते सोलापुरातील सभेस उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ओवैसींची अकोल्यातील सभा रद्द, सोलापुरात उपस्थित राहण्याची शक्यता - ambedkar
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने या निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी असदुद्दीन ओवैसी हे सभा घेत आहेत. सोलापूर आणि अकोल्यातही त्याच उद्देशाने १० एप्रिल रोजी क्रिकेट क्लब येथे सभा आयोजित केली होती. पण, तेलंगणातील निवडणुकात गुंतल्याने त्यांची ही सभा रद्द झाली असावी असे सांगण्यात येत आहे
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने या निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी असदुद्दीन ओवैसी हे सभा घेत आहेत. सोलापूर आणि अकोल्यातही त्याच उद्देशाने १० एप्रिल रोजी क्रिकेट क्लब येथे सभा आयोजित केली होती. पण, तेलंगणातील निवडणुकात गुंतल्याने त्यांची ही सभा रद्द झाली असावी असे सांगण्यात येत आहे.
सभेच्या दोन दिवस आधी ही सभा रद्द करण्यात आली असल्याचे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पक्षाकडूनही सभा रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सभा रद्द करण्याचे नेमके कारण कारण कळू शकले नाही. ते सोलापूर येथील सभेला जाणार आहेत. सोलापूर हे हैदराबादपासून जवळ असल्याने तिथे जाणे त्यांना शक्य असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.