महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

माढा शहरात नाही एकही लॉज अन् चित्रपटगृह, तरीही लोकसभा मतदारसंघाला नाव दिल्यामुळे देशात प्रसिद्ध

माढा शहर अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. या शहरामध्ये साधी निवासाची देखील व्यवस्था नाही.

माढा बसस्थानक

By

Published : Apr 10, 2019, 1:13 PM IST

Updated : Apr 10, 2019, 4:20 PM IST

सोलापूर - संपूर्ण राज्यात माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या शहराच्या नावावरून या लोकसभा मतदारसंघाला माढा असे नाव देण्यात आले आहे. त्या शहरामध्ये एकही लॉज आणि चित्रपटगृह नाही. यामुळे माढ्याचा विकास झाला का? हा मुद्दा या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

माढा शहर

लोकसभा मतदारसंघाची २००८ मध्ये पुनर्रचना झाली आणि या पुनर्रचनेनंतर २००९ च्या लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी निवडणूक लढवली. त्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला. यावेळी मात्र, येथील निवडणूक खूप प्रतिष्ठेची झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खुद्द पवारांनी या मतदार संघात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र, असे असले तरी ज्या शहराच्या नावावरून या लोकसभा मतदारसंघाला नाव देण्यात आलेले आहे. ते माढा शहर मात्र, अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. या शहरामध्ये साधी निवासाची देखील व्यवस्था नाही.

माढा हा तालुका असला तरीही तालुक्याच्या ठिकाणी आवश्यक असणार्‍या प्राथमिक कोणत्याही सुख-सुविधा या शहरात नाहीत. या शहराच्या नावावरून तालुक्याला तसेच विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघाला नाव दिले आहे. तरीही ही हे शहर फक्त म्हणायला शहर आहे, बाकी त्याची गणती एका मोठ्या खेड्यातच करावी लागते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत माढा ही ग्रामपंचायत होती. आता कुठे ती नगरपंचायत झाली आहे. हे तालुक्याचे शहर असले तरीही याठिकाणी सर्व सुख-सुविधा माढापासून जवळच असलेल्या कुर्डूवाडी या ठिकाणी आहेत. तालुक्याची अनेक प्रशासकीय कार्यालय ही कुर्डूवाडी येथेच आहेत. नव्याने तयार करण्यात आलेले तहसील कार्यालय फक्त शहरात आहे, बाकी पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी विभागाचे कार्यालय यासह प्रमुख महत्त्वाची सर्व कार्यालये कुर्डूवाडीत आहेत.

माढा शहरापासून जवळच कुर्डूवाडी हे मोठे रेल्वे स्टेशन आहे. तसेच येथे दळणवळणाच्या चांगल्या सुविधा असल्यामुळे मोठी बाजारपेठ आणि नगरपालिका आहे. या ठिकाणी प्रशासकीय आणि आणि इतर महत्त्वाची कार्यालये असून ती तालुक्यातील सर्व लोकांना सोयीस्कर पडतात. त्यामुळे ज्या माढा शहराच्या नावावरून तालुका विधानसभा मतदार संघ आणि लोकसभा मतदारसंघाला नाव देण्यात आले. ते शहर मात्र, विकासापासून अजूनही दूरच आहे.

Last Updated : Apr 10, 2019, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details