अकोला- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना भाजपचे उमेदवाराच्या विजयासाठी उभे करण्यात आल्याची चर्चा मुस्लीम समाजामध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसपासून दूर गेलेला हा समाज वंचित बहुजन आघाडीकडे वळत आहे. या समाजाला परत काँग्रेसकडे वळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अकोल्यात आले आहेत. हे नेते मुस्लीम समाजातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत आहेत.
मुस्लीम समाजाला काँगेसकडे वळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अकोल्यात - akola
पटेल यांच्या संदर्भात मुस्लीम समाजातील काहींनी आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले होते. तर संजय धोत्रे आणि हिदायत पटेल हे मित्र असल्याचेही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे पटेल यांना मुस्लीम समाजच नव्हे तर इतर समाजाने ही मतदान करू नये, असे आवाहनही त्यानंतर करण्यात येत होते.
भाजपतर्फे चौथ्यांदा संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा ऐनवेळी उभे केले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहे. काँग्रेसचे उमेदवार कोण या संदर्भात शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून उमेदवार देण्याचा निर्णय झाला नव्हता. परंतु, डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा नव्हे तर त्यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे बोलले जात होते. ऐनवेळी नेमकी माशी शिंकली कुठे? हे कोणालाही न कळाल्यामुळे पटेल यांचे नाव समोर करण्यात आले. दरम्यान, भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा झाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या विजयासाठी पटेल यांना उभे करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे जातीय समीकरण मांडून असलेल्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र मुस्लीम समाज वंचित बहुजन आघाडीकडे वळवला.
तसेच पटेल यांच्या संदर्भात मुस्लीम समाजातील काहींनी आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले होते. तर संजय धोत्रे आणि हिदायत पटेल हे मित्र असल्याचेही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे पटेल यांना मुस्लीम समाजच नव्हे तर इतर समाजाने ही मतदान करू नये, असे आवाहनही त्यानंतर करण्यात येत होते. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यावर नाराज असलेला मुस्लीम समाज यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे नेते अकोल्यात येत आहेत. ते मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरिक आणि काही व्यक्तींसोबत चर्चा करून मुस्लीम समाजाने काँग्रेसला मतदान करावे, या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचा मुस्लीम हा मतदार नाही. मात्र, त्याच पक्षाचे नेते अकोल्यात येत आहे. परंतु, ज्या पक्षाकडे मुस्लीम समाज आधीपासून सोबत आहे, त्याच पक्षाचे नेते काँग्रेसचे उमेदवार पटेल यांच्या प्रचारासाठी येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मुस्लिम नेत्यांकडून येथील मुस्लीम समाजाने काँग्रेसकडून मतदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही हे शनिवारी आले होते. तर राष्ट्रवादीचे मजीद मेमन हेही त्यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यांचे हे प्रयत्न किती यशस्वी होतात हे २३ मे च्या निकालाच्या दिवशी समोर येणार आहे.