नाशिक - महापालिका, राज्य आणि केंद्रात भाजप शिवसेना युतीचे सरकार होते. पण, नाशिकचा विकास झाला नाही. नाशिककरांची स्वप्ने या सरकारने धुळीस मिळवली. समृद्धी महामार्गाच्या नावाखाली विदर्भ समृद्धीचा घाट मुख्यमंत्र्यांनी घातला, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार जयवंत जाधव यांनी केला. ते नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
समृद्धी महामार्गाच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी केवळ विदर्भाचा विकास केला - जयवंत जाधव - ncp
नाशिक ते दिल्लीपर्यंत युतीची सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. मात्र, नाशिककरांच्या झोळीत काहीच पडले नाही. चालू प्रकल्प बंद ठेवण्याचा व काही कार्यालय पळवून नेण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. तर गुजरातला पाणी पळवून नेण्याचा कुटील डाव युतीने केला.
नाशिक ते दिल्लीपर्यंत युतीची सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. मात्र, नाशिककरांच्या झोळीत काहीच पडले नाही. चालू प्रकल्प बंद ठेवण्याचा व काही कार्यालय पळवून नेण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. तर गुजरातला पाणी पळवून नेण्याचा कुटील डाव युतीने केला. आज पाण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. त्याबरोबरच एमआयडीसीमधून नाशिकला वगळले. विदर्भाला समृद्ध करण्याकरता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कवडीमोल दराने जमिनी घेतल्या, असा आरोप जाधव यांनी केला.
आघाडीचे दोन्ही उमेदवार दिंडोरीचे धनराज महाले आणि नाशिकचे समीर भुजबळ कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज सादर करण्याकरता जयंत पाटील ,बाळासाहेब थोरात ,नवाब मलिक ,सुधीर तांबे काँग्रेसचे जिल्ह्यातील प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते उपस्थित राहतील अशी माहिती जाधव यांनी दिली.