नांदेड- अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. या बाबत अशोक चव्हाण यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अशोक चव्हाण विश्व हिंदू परिषदेचे सदस्य; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप - Vishwa Hindu Parishad
अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. या बाबत अशोक चव्हाण यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांच्या प्रचारासासाठी प्रकाश आंबेडकर यांची सभा नरसी येथे पार पडली. भर उन्हात या सभेला आंबडेकर यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारसह काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले.
या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका केली. त्यात त्यांनी चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. आंबेडकर यांनी या सभेत कारखानदारी विषयाबरही भाष्य केले. वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास, चव्हाण यांनी विकत घेतलेले साखर कारखाने पुन्हा सहकारी तत्वावर करु, असे आश्वसनही आंबेडकर यांनी दिले आहे.