महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

पवारांचा गड जिंकायचाच; भाजप नेते चंद्रकात पाटलांनी बारामतीत ठोकला तळ - rent

बारामती जिंकण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी बांधला चंग... बारामतीत भाड्याच्या घरात तळ ठोकून आखतायेत रणनीती.... भाजप उमेदवार कांचन कुल विरुद्ध राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विरोधात रंगणार सामना

चंद्रकात पाटलांनी बारामतीत ठोकला तळ

By

Published : Apr 5, 2019, 12:09 PM IST


पुणे- राज्यातील लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी सुपर फाईट म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघात पवारांना आसमान दाखवायचेच असा चंग भारतीय जनता पार्टीने बांधलेला आहे.

चंद्रकात पाटलांनी बारामतीत ठोकला तळ

२०१४ ची निवडणूक वगळता त्यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नावालाच उमेदवार उभा केला जात होता. मात्र, या निवडणुकीत भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. यंदा भाजप बारामतीत चमत्कार करणार, असे दावे भाजपकडून केले जात आहेत.

बारामतीच्या या निवडणुकीची जबाबदारी भाजपमध्ये सध्या चलती असलेले आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जवळचे मानले जाणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून पुण्यातील काही खास कार्यकर्ते बारामतीत तळ ठोकून आहेत आणि आता तर चंद्रकांत पाटील स्वतः बारामतीत मुक्कामी आहेत. चंद्रकांत पाटील यांनी बारामती एवढी मनावर घेतलीय की त्यांनी आता बारामतीत भाड्याने घर घेतले असून मतदानापर्यंत ते तिथेच राहून सर्व फिल्डिंग लावणार आहेत.

चंद्रकात पाटील यांच्यासोबत पक्षाने पुण्यातून माजी नगरसेवक गणेश बिडकर, भाजप पदाधिकारी राजेश पांडे हे दोन शिलेदार पाठवले आहेत. भाजपची ही सर्व टीम संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम करत आहे. त्यामुळे यंदा पवारांना बारामती सोपी नाही, असेच वातावरण निर्माण होताना दिसते आहे.

या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार सातत्याने विजयी झालेला आहे. शरद पवारांनी हा मतदारसंघ त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवला आणि सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार पद मिळवण्यासाठी रिंगणात उतरल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details