महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

मला निवडणूक लढवण्यापासून का रोखलं, मुंबईत हार्दिकचा मोदी-शाह जोडीला सवाल

मुंबईच्या उत्तर पश्चिम विभागातील युवकांसाठी काँग्रेसतर्फे आयोजित युवा संमेलनात बोलत होते. यावेळी उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, संजय निरुपमही  उपस्थित होते.

By

Published : Apr 7, 2019, 10:30 PM IST

हार्दिक पटेल

मुंबई - एकीकडे मोदी तरुणांना राजकारणात या असे आवाहन करतात, तर दुसरीकडे मला न्यायालयाच्या माध्यमातून आडकाठी घालत निवडणूक लढवू देत नाहीत, अशी टीका गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेलनी केली. ते मुंबईच्या उत्तर पश्चिम विभागातील युवकांसाठी काँग्रेसतर्फे आयोजित युवा संमेलनात बोलत होते. यावेळी उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर, संजय निरुपमही उपस्थित होते.

हार्दिक पटेल

भाजप सरकारने देशातील जनतेला फसवले आहे. ते लोकांच्या प्रश्नावर बोलत नाहीत. राष्ट्रवादावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. देशातील जे कोणी तरुण, शेतकरी यांच्या विरोधा बोलतात त्यांना ते देशद्रोही ठरवतात. अशा या खोटारड्या सरकारला सत्तेतून खाली उतरवायचे असेल तर देशातील तरुणांनी जागे होण्याची गरज आहे. एकीकडे मोदी दलितांचे पाय धुतात तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने दलित मुलीवर बलात्कार केला, त्यावर अजून कारवाई झाली नाही.

काँग्रेस हे पटेल, गांधी, आझाद, यांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने देश घडवला आहे. ज्या लोकांनी इंग्रजांची गुलामी केली ते लोकांनी आम्हाला राष्ट्रवादी शिकवू नये. काँग्रेस पक्ष आमच्यासारख्या युवासाठी गर्वाचा पक्ष आहे. मी गांधी पटेलांचे खरे वास्तव सांगण्यासाठी आलो आहे. आम्हा तरुणांना रोजगार, शिक्षण आणि सुरक्षा हवी आहे. भाजपकडे आता काही मुद्दे नसल्याने ते काहीही बोलत सुटले आहेत.

मोदी गुजरातचा विकास केला असल्याचा दावा करतात. त्यांचा हा दावा किती खोटा आहे हे तुम्हाला गुजरातमध्ये आल्यावर कळेल. गुजरातमधील लोक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. आज आमच्या राज्याची परिस्थिती भयाानक आहे. कुणीही सुरक्षित नाही. आज गुजरातच्या सौराष्टात दुष्काळ आहे तरी राज्य व केंद्र सरकारकडून कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही आहे. आजची गुजरातची परिस्थिती तुम्ही पाहिली असती तर मोदी कुधीच पंतप्रधान झाले नसते. ज्याला आम्ही तुरूणांनी दिल्लीत पोचवले, त्या मोदींना आता पायउतार करण्याची वेळ आली आहे. याची जबाबदारी आज तरुणांवर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details