सोलापूर - माढा मतदार संघात शिवसेना भाजपमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे. शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संजय भोसले आणि माण तालुक्यातील काही विभाग प्रमुखांनी माण - खटाव तालुक्यातील भाजपच्या सभांना अनुपस्थिती दाखवली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे.
माढ्यात सेना-भाजपमध्ये धुसफुस?, प्रचारसभांना शिवसेना नेत्यांची दांडी
माढा लोकसभा मतदार संघात शुक्रवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मेळावे आयोजित करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही मेळाव्यात व्यासपीठावरती शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवलेली दिसून आले.
माढा लोकसभा मतदार संघात शुक्रवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मेळावे आयोजित करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही मेळाव्यात व्यासपीठावरती शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवलेली दिसून आले. या सभांना चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर, रणजितसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.
तसेच, शनिवारी झालेल्या सभांमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मध्यस्थी करावी लागली होती. यावरुन माढा मतदारसंघात भाजप-सेनेतील धुसफूस चव्हाट्यावर अली आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यात दिलजमाई घडवून आणण्यात युतीच्या नेत्यांना यश मिळते का? हे पाहणे महत्वाचे आहे.