नाशिक - साडेतीन वर्षे सरकारी पाहुणचार करुन आलेल्या आसाराम बापू उर्फ भुजबळ कुटुंबीयांनी नाशिककरांची जबाबदारी घेतली का, असे म्हणून खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर टीका केली. समीर भुजबळ निवडणुकीला उभे राहतातच कसे, असा प्रश्न त्यांनी केला. नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले.
भुजबळ म्हणजे नाशिकचे आसाराम बापू - खा संजय राऊत
नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले.
पाकिस्तान धार्जिणे षड्यंत्र २०१९ च्या निवडणुकीत केले जात आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. तसेच, मायावती आणि शरद पवार यांच्या राजकीय महत्वकांक्षेवर त्यांनी टीका केली. मायावती, शरद पवार, मुलायम सिंह या सर्वांनाच पंतप्रधान व्हावे वाटते. पण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गिरीश महाजन यांनी समीर भुजबळ यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की समीर भुजबळ यांच्या कर्तृत्वाचा काय पाढा वाचावा हे तर सर्व नाशिककरांना माहीतच आहे. कितीही पैसे वाटले जाहिरातबाजी केली कुटनिती केली तरी जनता मत देणार नाही. मात्र समीर यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. एवढे सर्व झाले तरी निवडणुकीला उभे राहिले. हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्याचे आव्हान यावेळी गिरीश महाजनांनी केले.