महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

तामिळनाडूतील वेल्लोरची निवडणूक रद्द; मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न - tamil nadu

तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात गुरुवारी १८ एप्रिलला होणारे मतदान रद्द करण्यात आले आहे. येथील मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी हा निर्णय घेतला. याप्रकारे एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चेन्नई

By

Published : Apr 17, 2019, 9:52 AM IST

चेन्नई - तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघात गुरुवारी १८ एप्रिलला होणारे मतदान रद्द करण्यात आले आहे. येथील मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मंगळवारी हा निर्णय घेतला. याप्रकारे एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

द्रमुकचे ज्येष्ठ नेते दुराइमुरुगन यांचे पुत्र आणि वेल्लोर येथील पक्षाचे उमेदवार काथिर आनंद यांच्या घरातून २९ मार्चला साडेदहा लाखांची रोकड हस्तगत झाली होती. तसेच १ एप्रिलला दुराईमुरुगन यांच्या निकटच्या एका व्यक्तीच्या सिमेंट गोदामातून ११ कोटी ५३ लाख रुपये हस्तगत झाले होते. ही रोकड दुराईमुरुगन यांच्या महाविद्यालयातून या गोदामात हलवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील निवडणूक रद्द करावी, अशी शिफारस आयोगाने राष्ट्रपतींकडे केली होती. राष्ट्रपतींनी त्यानुसार वेल्लोरमधील अधिसूचना रद्द केली आहे.

दरम्यान, याबाबत काथिर आनंद यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. येथील निवडणूक रद्द केल्याने त्याचा फायदा भाजप उमेदवाराला होऊ शकतो. प्राप्तिकर विभागाने टाकलेला छापा हा बनावट अहवालाच्या आधारे टाकण्यात आला आहे. छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे वॉरन्ट नव्हते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात केलेल्या कारवाईमुळे आमचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details