महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

लोकसभा निवडणूक : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बजावला मतदानाचा हक्क - jait

शिवराज सिंह चौहानांनी त्यांच्या जैत या मुळ गावी बजावला मतदानाचा हक्क... म्हणाले काँग्रेसच्या काळात देशद्रोहाला होते स्थान.. भाजपच्या काळात फक्त राष्ट्रवादाला महत्व

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

By

Published : May 12, 2019, 2:00 PM IST

भोपाळ - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या आणि मध्यप्रदेशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला आज सुरुवात झाली. या टप्प्यात अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, मध्य प्रदशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विदिशा मतदारसंघातील त्यांच्या जैत या गावी मतदानाचा हक्क बजावला.

शिवराज म्हणाले, ही लोकसभा निवडणूक देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. तसेच राष्ट्रवादच सर्व काही असून काँग्रेसच्या काळात देशद्रोह चालत होता. आता भाजपच्या काळात केवळ राष्ट्रवाद होतो.

चौहान यांनी यावेळी जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत, दिग्विजय सिंह यांनाही मतदान करण्याचे उपहासात्क आवाहन केले. तसेच, या लोकसभा निवडणुकीत मध्यप्रदेशातील आठही जागांवर भाजप विजयी होईल, असेही चौहान म्हणाले.

चौहान म्हणाले, ही लोकसभा निवडणूक देशाच्या विकासासह, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आणि लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. केवळ सुरक्षा म्हणजे राष्ट्रवाद नाही. जनतेचे हित, गरीबी हटवणे, शेतकऱ्यांना सुविधा देणे आणि बेरोजगारी कमी करणे म्हणजे राष्ट्रवाद आहे. काँग्रेसच्या काळात तर देशद्रोह होत होता, असा निशाणाही त्यांनी यावेळी काँग्रेसवर साधला.

ABOUT THE AUTHOR

...view details