महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

'हे' आहेत दिल्लीतील सर्वात वयोवृद्ध मतदार, वय जाणून तुम्हीही  व्हाल अवाक - ELELTION

जानेवारी महिन्यामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. मतदानासाठी ते आज कारमधून मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यानंतर व्हीलचेअरवरून प्रवेश करत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी माध्यमांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

१११ वर्षीय बच्चन सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क

By

Published : May 12, 2019, 12:21 PM IST

Updated : May 12, 2019, 2:30 PM IST

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज एकूण ५९ मतदारसंघांत मतदान सुरू आहे. दिल्लीत एकूण ८ मतदारसंघाचा समावेश असून आज दिल्लीतील सर्वात वयोवृद्ध मतदार बच्चन सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी दिल्लीतील तिलक विहार मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आज लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दिल्लीतील सर्वात वयोवृद्ध मतदार बच्चन सिंह
जानेवारी महिन्यामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. मतदानासाठी ते आज कारमधून मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यानंतर व्हीलचेअर वरून प्रवेश करत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी माध्यमांनी त्यांना गराडा घातला होता.
१११ वर्षीय बच्चन सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क
बच्चन सिंग हे १९४७ ला दिल्लीमध्ये आले होते आणि त्यांनी १९६२ ला सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला होता, तेव्हापासून ते प्रत्येक निवडणुकीवेळी मतदान करतात, असे त्यांचे पुत्र रतन सिंग यांनी सांगितले. बच्चन सिंग यांची पत्नी गुरबचन कौर यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी २०११ मध्ये निधन झाले आहे.

दिल्लीमध्ये बच्चन सिंग हे सर्वात वयोवृद्ध मतदार आहेत. शुक्रवारी पश्चिम जिल्हा निवडणूक अधिकारी अजीमुल हक यांनी त्यांची राहत्या घरी भेट घेऊन मतदानासाठी निमंत्रण दिले होते.

Last Updated : May 12, 2019, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details