महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

सोनिपतमध्ये चौटाला आणि भूपेंद्रसिंह यांच्यामध्ये चुरस, दुष्यंत चौटालांना विजयाचा विश्वास - election

जननायक जनता पक्षाचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला म्हणाले, की आम्ही हरियाणाला जातीपातीच्या राजकारणातून बाहेर काढू. ही संधी आम्ही हरियाणातील नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. आमच्या पक्षाकडून आम्ही तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. आमचे उमेदवार हे चाळीशीच्या आतीलच आहेत.

पत्रकार परिषदेत दुष्यंत चौटाला

By

Published : Apr 22, 2019, 2:10 PM IST

दिल्ली - लोकसभेच्या निवडणुका तिसऱया टप्प्यात आल्या आहेत. याबरोबरच प्रचाराला धार चढत आहे. हरियाणातील सोनीपत येथील निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ घातली आहे. येथून माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे दिग्गज नेते भूपेंद्रसिंह हुडा निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्यासमोर आव्हान आहे अजय चौटाला यांचे कनिष्ठ पुत्र दिग्विजय चौटाला यांचे.


काँग्रेस आणि भाजप दोघांनाही बाजूला सारुन चौटाला बंधुंनी वेगळी चूल मांडली आहे. आपल्या जननायक जनता पक्षासोबत आम आदमी पक्षाला घेऊन ते निवडणूक लढवत आहेत. जननायक जनता पक्षाचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला म्हणाले, की आम्ही हरियाणाला जातीपातीच्या राजकारणातून बाहेर काढू. ही संधी आम्ही हरियाणातील नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. आमच्या पक्षाकडून आम्ही तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. आमचे उमेदवार हे चाळीशीच्या आतीलच आहेत.

दिग्विजयबद्दल विचारल्यानंतर दुष्यंत म्हणाले, की तो मेहनत घेत आहे. त्याचे कामच सर्व काही बोलेल. मला खात्री आहे त्याचा वियज निश्चित होईल. दरम्यान, जननायक जनता पक्षाने सात लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले आहेत. तर , त्यांचा मित्र पक्ष आम आदमी पक्ष तीन जागांवरुन लढत आहे. स्वतः दुष्यंत चौटाला हिस्सारमधून निवडणूक लढत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details