सातारा :वाढे फाटा परिसरात पुणे-बंगळुरू महामार्गावरील हॉटेल परिसरातील एका पानटपरी जवळ रात्री एक वाजण्याच्या सुमारास अमित भोसले या तरूणाची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अमित हा नाश्ता करण्यासाठी थांबला असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्याच्यावर चार राऊंड फायर केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे आणि सातारा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
हत्येचे कारण अस्पष्ट :सातारा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अमित भोसले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. दरम्यान, ही हत्या कोणत्या कारणातून झाली आहे, हे स्पष्ट झालेले नाही. व्यावसायिक कारणातून अथवा आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली आहे का, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. तपासासाठी सातारा पोलिसांची पथके पुणे, कराड आणि कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा ग्रामीण पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या : याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाढे फाट्यावरील एका हॉटेल समोर तीन ते चार तरुण गप्पा मारत उभे राहिले होते. त्यावेळी तेथे अमित भोसले हे सुद्धा होते. त्यातील एका युवकाने अमित भोसले यांच्यावर अचानक गोळीबार केला. एकूण सहा गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूचे व्यावसायिक ही तेथे धावत आले. मात्र, तोपर्यंत गोळीबार करणारे तरुण तेथून पसार झाले होते.
संशयित आरोपी सापडले नाहीत :या प्रकाराची माहिती सातारा ग्रामीण पोलिस, सातारा शहर आणि एलसीबी पोलिसांना मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौज फाटा वाढे फाट्याकडे रवाना झाला. पोलिसांनी वाढे फाटा परिसर पिंजून काढला. मात्र, संशयित आरोपी सापडले नाहीत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला हे मात्र अध्यापही पुढे आले नाही. व्यावसायिक अमित भोसले यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्या असून रुग्णालयासमोर कुटुंबीयांनी, मित्रांनी धाव घेतली आहे.आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून, ही पथके सातारा शहरासह पुणे, कराड, कोल्हापूर येथे रवानाही झाली आहेत. व्यावसायिक कारणातून किंवा आर्थिक देवाणघेवाणातून हा खून झाला आहे का, याची पोलिस माहिती घेत आहेत.
हेही वाचा :Buldhana Ragging बुलढाण्यात रॅगिंगमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या ऑडिओ क्लिपमुळे झाला खुलासा