मुंबई : भाजपचे माजी प्रवक्ता नुपूर शर्मा ( Former BJP Spokesperson Nupur Sharma ) यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू मोहम्मद पैगंबर विरोधात वक्तव्य केले होते. याला समर्थन करणारे पोस्ट करणारे ( Umesh Kolhe ) अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्याकरण्यात आली होती. या प्रकरणातएनआयए 7 आरोपींना अटककरण्यात ( NIA Arrested 7 Accused ) आली होती. आज सर्व आरोपींची ( NIA ) एनआयए कोठडी संपत असल्याने सर्वाना न्यायालयात हजर करण्यात आला होते. या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी : या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएला दिल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये आज हजर करण्यात आले होते. या आरोपींना दोन वेळा एनआयए कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, एनआयएकडून पुन्हा आरोपींची कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, आरोपींच्या वकिलांकडून विरोध ठेवण्यात आल्यानंतर अखेर न्यायालयाने या सर्व आरोपींची 5 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
आरोपींचे दहशतवादी संघटनेशी संबंध : एनआयएने कोर्टात म्हटले आहे की, या आरोपींचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे अनेक पुरावे तपासादरम्यान सापडले आहेत. सध्या आरोपींची कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. या संदर्भात खुलासा करता येणार नाही. मात्र, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो याकरिता या सर्व आरोपींना 7 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात दहशतवादी संघटनेची संबंधित UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.