मुंबई :२५ नोव्हेंबरला फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसह त्यांच्या संस्थेकरीता जमीन खरेदी संदर्भात कामासाठी राजावाडी, घाटकोपर (पूर्व) येथून पायी चालत जात असताना त्यांच्यावर दरोडा टाकण्यात आला. त्यांच्याकडचे २५ लाख चोरण्यात आले. या प्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली ( Tilaknagar police arrested gang stole 25 lakhs ) आहे.
२५ लाखांची चोरी करणाऱ्या टोळीला टिळकनगर पोलिसांकडून अटक - सहा जणांच्या टोळीला अटक
२५ लाखांची चोरी करणाऱ्या टोळीला टिळकनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली ( Tilaknagar police arrested gang stole 25 lakhs ) आहे. जमीन खरेदी संदर्भात कामासाठी राजावाडी, घाटकोपर (पूर्व) येथून जात असताना त्यांच्यावर कट रचून हल्ला करण्यात आला. त्यांच्याकडून पैशांची बॅग चोरण्यात आली.
सहा जाणांच्या टोळीला अटक :अर्शद नरूलेन खान, वय ३२ वर्षे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या चौकशीच्या आधारे नमुद गुन्हयातील अन्य आरोपी अरफात मोहम्मद मोर्तुझा खान, वय २५ वर्षे, अकबर मोहमद कासीम शेख, वय ५० वर्षे, नईम अलाउद्दीन शेख, वय- ४३ वर्षे, इम्तीयाझ अब्दुल मजीद खान, वय ३२ वर्षे आणि रविंद्र सुदाम खंडागळे, वय ५२ वर्षे ही अटक करण्यात आलेल्या आरोपींचा नावे आहेत.अटक केलेल्या आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह कट रचून २५ लाख रूपयांची रोख रोकड असलेली बॅग मारहाण करून लुटून नेली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तपासाअंती टिळकनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९५, १२०(ब), ४२०, १७० आणि ३४ गुन्हा नोंद करण्यात (Gang of six arrested ) आला.
पोलिसांची कामगिरी :हा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक टिळकनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अजय गोल्हार व पथक यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपास यांचा योग्य समन्वय साधून गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व पथक यांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रिक्षा आणि दोन दुचाकी अंदाजे किंमत १ लाख ५२ हजार रूपये असे एकुण ६ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हयाचा पढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख हे करीत आहेत.