पलामू -भरधाव स्कॉर्पिओने चिरडल्याने चार चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना पलामू जिल्ह्यातील नौदिहा बाजार पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रजासत्ताकदिनाच्या सायंकाळी घडली. मृतांमध्ये स्कॉर्पिओच्या चालकाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात आणखी काही चिमुकले जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून त्यांनी स्कॉर्पिओ जप्त केली आहे.
अपघातात चार चिमुकल्यांचा मृत्यू :प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम देशभर साजरा होत असताना पलामूत शोककळा पसरली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम साजरा करण्यासाठी काही चिमुकले जमा झाले होते. यावेळी भरधाव आलेल्या स्कॉर्पिओने या चिमुकल्यांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला, इतर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
चालकाचाही अपघातात मृत्यू :स्कॉर्पिओच्या चालकाने भरधाव वेगात कार चालवून चार चिमुकल्यांचा प्राण घेतला. या अपघातात स्कॉर्पिओ चालकाचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नौदिहा पोलीस ठाण्याचे प्रभारी अमन कुमार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अमन कुमार यांनी जखमींना उपचारासाठी एमएमसीएचमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे.
स्कॉर्पिओ करण्यात आली जप्त :भरधाव वेगात आलेल्या स्कॉर्पिओ कारने चार चिमुकल्यांना चिरडल्याने मोठा अपघात घडला. त्यामुळे पलामू जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या अपघातात स्कॉर्पिओच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अपघातातील स्कॉर्पिओ जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. अपघात नेमका कसा घडला याबाबत मात्र अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
हेही वाचा - Sangli Crime : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीशी छेडछाड, मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल