महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

पिंपरी-चिंचवडमध्ये नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार; आरोपी मोकाट - तरुणीवर बलात्कार

पिंपरी-चिंचवडमध्ये नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. समीर भालेराव असं आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार; आरोपी मोकाट
पिंपरी-चिंचवडमध्ये नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार; आरोपी मोकाट

By

Published : Aug 25, 2021, 12:06 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याचं पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. समीर भालेराव असं आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.

पीडितेची आरोपीशी आधीपासून ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघे एकमेकांना ओळखतात. पीडित तरुणीला मॉडेलिंगची आवड होती. तर आरोपी समीर भालेराव हा रॅप सिंगर असून त्याने अनेक मुलींना मॉडेलिंगचं काम मिळवून दिलं होतं. पीडित तरुणीचा मोबाईल नंबर घेऊन तिला आरोपी समीरने प्रपोज केले. परंतु, त्याला नकार दिल्याने समीरला संताप अनावर झाला होता. त्यानंतर, तरुणीच्या घरी जाऊन तिच्या भावाला मारण्याची धमकी देत तरुणीसह भावाला राहत्या घरी घेऊन गेला. तिथे तरुणीच्या आई वडिलांना बोलावून जीवे मारण्याची धमकी देत भावाला घेऊन जाण्यास त्याने सांगितले.

नशेचे इंजेक्शन देऊन वारंवार बलात्कार

दरम्यान, समीर हा तरुणीवर वारंवार बलात्कार करत होता. तिला नशा येणारे इंजेक्शन द्यायचा असं तक्रारीत म्हटलंय. तरुणीला घरात बंदीस्त करून तो बाहेर जायचा, दरवाजाला कुलूप लावलेले असल्याचे. मात्र, एके दिवशी तरुणीने संधी साधून पळ काढला. तिने वडिलांचे घर गाठत चुलत भावाकडे आश्रय घेतला. त्यानंतर समीर हा तरुणीला अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून पाठवत धमकी देत होता. तर, वडिलांच्या व्हॉटसअॅप वर देखील अश्याच प्रकारचे व्हिडिओ पाठवत शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक केली नाही असं हिंजवडी पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा -प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करणारा प्रियकर गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details