महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

चांदुररेल्वेत अवैध गावठी दारू अड्यावर धाड; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट

गौरखेडा, तरोडा पारधीबेडा येथे धाड टाकत १० प्लास्टिक ड्रम प्रत्येकी २०० लिटर मोहा सडवाने भरलेले होते. या कारवाईत पोलीसांनी एकूण १ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये आरोपी गिरीश सुभाष पवार (गौरखेडा) हा फरार आहे. यानंतर बासलापूर येथील पारधीबेड्यावर देखील कारवाई करत एकूण ३८ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करून साठा नष्ट केला आहे. तर यामध्ये आरोपी राजा हायब्रीड पवार (बासलापुर) हा फरार आहे.

अवैध दारु कारवाई
अवैध दारु कारवाई

By

Published : Mar 17, 2021, 5:59 PM IST

अमरावती-जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गावठी दारूचा सर्वात मोठा अड्डा पोलीसांनी नष्ट केला आहे. गाैरखेडा, तरोडा तसेच बासलापूर या पारधी बेड्यावर शेतशिवारात धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकूण पावणे दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील गौरखेडा, तरोडा पारधीबेडा येथे धाड टाकत १० प्लास्टिक ड्रम प्रत्येकी २०० लिटर मोहा सडवाने भरलेले होते. या कारवाईत पोलीसांनी एकूण १ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये आरोपी गिरीश सुभाष पवार (गौरखेडा) हा फरार आहे. यानंतर बासलापूर येथील पारधीबेड्यावर देखील कारवाई करत एकूण ३८ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करून साठा नष्ट केला आहे. तर यामध्ये आरोपी राजा हायब्रीड पवार (बासलापुर) हा फरार आहे. ही कारवाई चांदूर रेल्वे चे उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमुळे अवैध गावठी दारू बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details